विधान परिषद : सदाभाऊ खोतांचा अर्ज मागे; भाजपचे 5 उमेदवार रिंगणात; कॉन्सन्ट्रेशनने निवडणूक!! स्ट्रेटेजी काय??; टार्गेटवर कोण??


नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत उत्तम रणनीती आखून शिवसेनेला धोबीपछाड देणाऱ्या भाजपने विधान परिषद निवडणुकीतील एक पाऊल मागे घेतले असून सहावे उमेदवार सदाभाऊ खोत यांना अर्ज मागे घ्यायला लावला आहे. परंतु काँग्रेस आपले 2 उमेदवार मैदानात कायम ठेवले असून आता भाजपचे 5 आणि महा विकास आघाडीचे 6 असे 11 उमेदवार मैदानात उरणार आहेत. Sadabhau Khot’s application back; 5 BJP candidates in the fray; Election by Concentration

सदाभाऊ खोत यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावली. भाजपने विधान परिषद निवडणूक एक अधिक कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्सने लढवायचे ठरवले दिसत आहे. 6 उमेदवार दिले असते तर महाविकास आघाडीला भाजपच्या 2 उमेदवारांना पाडायची संधी मिळाली असती. भाजपसाठी ही निवडणूक अधिक अवघड ठरली असती. परंतु आता सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे अधिक कॉन्सन्ट्रेशनने निवडणूक लढवू शकतील आणि काँग्रेसच्या दोन पैकी एका उमेदवाराला किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांना थेट धक्का देऊ शकतील, अशी मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

– संजय राऊत हेच मूळ टार्गेट

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या टार्गेटवर संजय पवार यांच्या पेक्षा संजय राऊत हेच होते. संजय राऊत यांचा निसटता विजय हा भाजपचा राजकीय चाणाक्षपणाचे द्योतक मानला गेला आहे. अन्यथा संजय राऊत अधिक मतांनी विजयी होऊ शकले असते. परंतु 2 पैकी 1 संजय जाणार असे कन्फ्युजन भाजपने तयार करून शिवसेनेच्या गोटात घबराट माजवली होती. त्यातून शिवसेनेची स्ट्रॅटेजी चुकली, अशी चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात आहे.

– खडसे, पडवी, टार्गेटवर

विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील याचप्रकारे भाजपने आपले टार्गेट सेट केले असून राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळालेले एकनाथ खडसे शिवसेनेचे आमशा पडवी आणि काँग्रेसचा दोन पैकी एक उमेदवार हे भाजपच्या टार्गेटवर असल्याचे बोलले जात आहे. त्यातही एकनाथ खडसे आणि आमच्या पडली हे दोघे भाजपच्या विशेष टार्गेटवर आहेत. एक तर एकनाथ खडसे सध्या भाजप विरोधात जोरदार आघाडी उघडून बोलत आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या राजकीय कौशल्याने सामान्य शिवसैनिकांना निवडून आणू शकत नाहीत हे जसे राज्यसभा निवडणुकीत संजय पवार यांच्या पराभवातून दाखवून दिले तसेच आमशा पडवी यांच्या रूपाने देखील सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली तरी मुख्यमंत्री त्याला निवडून आणू शकत नाही हे भाजपला दाखवून द्यायचे आहे.

– शिवसेनेतील तिसरी, चौथी फळी टार्गेटवर

शिवसेनेतल्या तिसर्‍या आणि चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्यांवर भाजपने वेगळ्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन केले आहे याचेच हे टार्गेट म्हणजे द्योतक मानले जात आहे. सदाभाऊ खोत यांच्या रूपाने सहावा उमेदवार मैदानात शिल्लक राहिला असता तर भाजपच्या राजकीय कॉन्सन्ट्रेशन वर मर्यादा आली असती. ती टाळण्यासाठी भाजपने सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेतल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे.

– अजित पवार गट भाजपच्या गळाला

आता इतके सगळे प्रयत्न केल्यानंतर भाजप आपले पाचही उमेदवार निवडून आणू शकणार का? भाजपा कोणती स्ट्रॅटेजी आखून ते निवडून आणू शकेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने अजित पवार यांच्या गटातील आमदारांना त्यासाठी गळाला लावले असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना उघडपणे भाजपला साथ देण्याची साद घातली आहे. प्रत्यक्षात अजित पवारांनी साथ दिली नाही तरी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जरी थोडा कल दाखविला तरी ते भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीत अजित पवार यांना मानणाऱ्या अपक्ष आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मते दिले नसल्याचा संशय शिवसेनेला आहेच. तो यानिमित्ताने विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अधिक ठळक करण्याचा देखील भाजपचा प्रयत्न असल्याचे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भाजपच्या वतीने सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या क्षणी आपला अर्ज माघार घेतल्यावर असून राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनीही आपला डमी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता विधानरपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

– विधान परिषद रिंगणात उरलेले उमेदवार 

– शिवसेना : सचिन अहिर, आमश्या पाडवी

– राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर

– काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

– भाजप : प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रसाद लाड

– पाचवी जागा जिंकण्याचा फडणवीसांचा विश्वास

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून विधान परिषदेची पाचवी जागाही अशाच पद्धतीने निवडून आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. सत्तारुढ गटामध्ये असंतोष आहे. त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे आम्ही पाचवी जागा जिंकणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे

Sadabhau Khot’s application back; 5 BJP candidates in the fray; Election by Concentration

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात