सचिन पायलट चार- पाच दिवस वाट पाहत होते, ४०-५० फोन केले पण राहूल आणि प्रियंका गांधी यांनी उत्तरही दिले नाही

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे चार-पाच दिवस दिल्लीत वाट पाहत होते. त्यांनी ४०-५० फोन केले. मात्र, राहूल किंवा प्रियंका गांधी यांनी त्यांना उत्तरही देण्याची तसदी घेतली नाही, असा गौप्यस्फोट भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनी केला आहे.Sachin Pilot waited for four-five days, called 40-50 but Rahul and Priyanka Gandhi did not answer


विशेष प्रतिनिधी

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे चार-पाच दिवस दिल्लीत वाट पाहत होते. त्यांनी ४०-५० फोन केले. मात्र, राहूल किंवा प्रियंका गांधी यांनी त्यांना उत्तरही देण्याची तसदी घेतली नाही, असा गौप्यस्फोट भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनी केला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशेक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात पक्षांतर्गत वाद सुरू आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून त्यांच्यातील वाद धुमसत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर आपली बाजू मांडण्यासाठी सचिन पायलट हे दिल्लीला गेले होते. त्यांनी कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी आणि सरचिटणिस प्रियंका गांधी यांची भेट घेण्याच प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भेट दिली नाही.दुसºया बाजुला सचिन पायलट यांची चांगलीच कोंडी झाली आहे. गेल्या वेळी त्यांनी पक्षाविरुध्द बंड केले तेव्हा त्यांच्यासोबत असलेले आमदारही आता सोडून गेले आहेत. अशोक गेहलोत यांचे गुणगाण करत आहेत. बहुजन समाज पक्षातून कॉँग्रेसमध्ये आलेले आमदार तर सचिन पायलट गटाच्या आमदारांवर गद्दार असल्याचा आरोप करत आहेत.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कॉँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केल्यावर पायलट यांचा गट आणखी सक्रीय झाला होता. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी पायलट दिल्लीला पोहोचले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना वेळच दिला नाही.

Sachin Pilot waited for four-five days, called 40-50 but Rahul and Priyanka Gandhi did not answer

महत्वाच्या बातम्या