रशियन कोरोना प्रतिबंधक लस असलेल्या कोरोना व्ही या लसीचे आता पुण्यात उत्पादन सुरू होणार आहे. या कोरोना लसीच्या उत्पादनासाठी आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने काही अटीशर्थींसह पुण्यातील हडपसर इथल्या प्रकल्पात सीरमला स्फटनिक लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे.Russian Sputnik V to be manufactured in Pune, Center approves Serum Institute
विशेष प्रतिनिधी
मुंबई : रशियन कोरोना प्रतिबंधक लस असलेल्या कोरोना व्ही या लसीचे आता पुण्यात उत्पादन सुरू होणार आहे. या कोरोना लसीच्या उत्पादनासाठी आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने काही अटीशर्थींसह पुण्यातील हडपसर इथल्या प्रकल्पात सीरमला स्फटनिक लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. सीरमने या लसीच्या उत्पादनासाठी रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट आॅफ एपिडेमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीसह करार केला आहे.
औषध नियामक मंडळाने सीरम इन्स्टिट्यूटला भारतात स्फुटनिक व्ही लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. सीरमने स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनाची परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. सीरममार्फत सध्या कोविशील्ड लसीचे उत्पादन सुरु आहे.
रशियाच्या स्फुटनिक व्ही लसीचे उप्तादन भारतात सध्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करत आहे. डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांनी त्याची किंमत जाहीर केली आहे. स्पुटनिक व्हीची किंमत 948 रुपये आणि 5 टक्के जीएसटी असेल. अशा प्रकारे, एका डोसची किंमत 995.40 रुपये आहे.
सीरमकडून नोवावॅक्स लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या परवानगीची आवश्यकता आहे. एप्रिलमध्ये डीसीजीआयनं यासाठी आपत्कालीन परावनगी दिलेली आहे.
स्फुटनिक व्ही लसीच्या लसीकरणाला भारतात सुरुवात देखील झाली आहे. भारतात या लसीचे उत्पादन सुरु करण्यात येणार असल्याचं रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड आणि भारतातील औषध निमार्ता कंपनी पॅनेशिया बायोटेकनं संयुक्तरित्या जाहीर केले आहे.
भारतीय औषध निमार्ती कंपनी पॅनेशिया बायोटेकनं बनवलेली स्पुतनिक वी लसीची पहिली खेप चाचणीसाठी रशियाला रवाना करण्यात आली आहे. रशियात त्या लसीच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात येणार आहे.
स्पुतनिक वी लसीची निर्मिती हिमाचल प्रदेशातील एका कंपनीमध्ये करण्यात आली आहे. गुणवत्ता चाचणी यशस्वी ठरल्यास उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.
रशियाची आरडीआयएफ आणि पॅनेशिया बायोटेक यांच्यासोबत एप्रिलमध्येच स्पुतनिक वी लसीचं उत्पादन करण्याबाबत चर्चा झाली होती. पॅनेशिया बायोटेक यावर्षाच्या अखेरपर्यंत 10 कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत.
आरआयडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिमित्रीव यांनी पॅनेशिया बायोटेकच्या साथीनं कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन या महामारीशी लढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, असं म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App