रशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू


वृत्तसंस्था

मॉस्को : रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत सोमवारी एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांचे वय 11 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय शाळेतील दोन शिक्षक आणि दोन सुरक्षा रक्षकांचाही मृत्यू झाला आहे.Russian school shooting 15 killed 24 injured including 11 students Death of children under 11 years

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इझेव्हस्क शहर रशियाची राजधानी मॉस्कोपासून 960 किमी अंतरावर आहे आणि उदमुर्तिया क्षेत्राचा भाग आहे. हा परिसर औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जातो. या शहराची लोकसंख्या 6 लाख 40 हजार आहे.उदमुर्तियाचे गव्हर्नर अलेक्झांडर ब्रेचलोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, शाळा सुरू झाल्यानंतर ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने बंदूक घेऊन शाळेत प्रवेश केला. तो बाउंड्री वॉल चढून शाळेत पोहोचला आणि या कारणामुळे तो रक्षकांच्या नजरेतून निसटला, असे समजते.

या व्यक्तीने आत प्रवेश करताच वर्गात जाणाऱ्या मुलांवर गोळीबार सुरू केला. यादरम्यान शाळेत पळापळ झाली. जेव्हा सशस्त्र सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला घेरले तेव्हा त्याने स्वतःच्या कपाळावर गोळी झाडली. त्याचाही मृत्यू झाला आहे.

Russian school shooting 15 killed 24 injured including 11 students Death of children under 11 years

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय