पुतीन यांना जिवे मारण्याचा कट : कार बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न, रशियन राष्ट्राध्यक्षांचा ताफा रुग्णवाहिकेने रोखला


वृत्तसंस्था

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. द मिररच्या वृत्तानुसार, पुतीन यांच्या लिमोझिन कारजवळ एक बॉम्ब फेकण्यात आला. त्यात ते थोडक्यात बचावले. रशियाने या हल्ल्याची अद्याप पुष्टी केली नाही. हा हल्ला केव्हा व कुठे झाला हे ही अद्याप स्पष्ट झाले नाही.Plot to kill Putin Car bomb attempt, Russian President’s motorcade intercepted by ambulance

घरी जात होते पुतीन

द मिररच्या वृत्तानुसार, पुतीन आपल्या लिमोझिन कारमधून घरी परतत होते. तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. पुतीन यांच्या कारला एस्कॉर्ट करणाऱ्या पहिल्या गाडीचा मार्ग एका रुग्णवाहिकेने रोखला. त्यानंतर दुसरी गाडीही रोखण्यात आली. पुतीन तिसऱ्या गाडीत बसले होते. त्यांच्या कारच्या डाव्या टायरजवळ मोठा स्फोट होऊन धूर निघाला. त्यानंतर पुतीन यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.



आत्मघातकी हल्ल असण्याची भीती

एका रशियन टेलिग्राम चॅनलच्या माहितीुसार, हा आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता आहे. कारण, ज्या रुग्णवाहिकेने पुतीन यांचा ताफ्याची पायलट व्हॅन रोखली, तिचा चालक मृतावस्थेत आढळला. त्याचा मृतदेह हाती लागला आहे. दुसरीकडे, पुतीन यांना एस्कॉर्ट करणाऱ्या पहिल्या कारमधील 3 जण बेपत्ता आहेत.

पुतीन यांचा मुख्य अंगरक्षक ताब्यात

रशियन टेलिग्राम चॅनलने या हल्ल्याप्रकरणी पुतीन यांच्या मुख्य अंगरक्षकासह अनेक सुरक्षा रक्षकांना निलंबित करून ताब्यात घेण्यात आल्याचा दावा केला आहे. पुतीन यांच्या मुव्हमेंटची माहिती त्यांच्या सुरक्षा सेवेशिवाय अन्य कुणालाही नव्हती. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रशिया-युक्रेनमध्ये 6 महिन्यांपासून युद्ध

रशिया -युक्रेनमध्ये गत 6 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेन अक्षरशः बेचिराख झाला आहे. तर रशियाचेही मोठे नुकसान झाले आहे. या युद्धाच्या झळा जगालाही सोसाव्या लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठका झाल्या. पण दोन्ही देश युद्ध मैदानातून मागे हटण्यास तयार नाहीत.

Plot to kill Putin Car bomb attempt, Russian President’s motorcade intercepted by ambulance

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात