विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध झाले तर हा मुद्दा दोन-तीन देशांचा राहणार नाही, अशी भीती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे.रशियन सैन्याने युक्रेनच्या लुहान्स्क-डोनेत्स्क (डॉनबॉस क्षेत्र) या दोन प्रांतात प्रवेश केला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी 13 तासांपूर्वी (भारतीय वेळेनुसार रात्री 3 वाजता) युक्रेनच्या या दोन राज्यांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते.Russia-Ukraine war will not be an issue for two or three countries: Defense Minister Rajnath Singh
यानंतर रशियन सैन्याचे रणगाडे या भागांकडे सरकत आहेत. युक्रेन आणि रशिया देशात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या लुहान्स्क-डोनेत्स्क या दोन प्रांतात प्रवेश देखील केला आहे. त्यामुळे युद्धपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असताना राजनाथ सिंह यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध झाले तर हा मुद्दा दोन-तीन देशांचा राहणार नाही, युक्रेन वादावर चचेर्तून तोडगा काढावा, अशी भारताची भुमिका आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करुन वाद मिटवावा. असे आपले मत असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, दोन्ही देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धामुळे निर्माण झालेला तणाव सध्याच्या जागतिक परिस्थितीसाठी योग्य नाही. युद्ध झाल्यास हा मुद्दा दोन-तीन देशांपूरताच मयार्दीत नसणार आहे. आमच्या माहितीनुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि रशिया अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चचेर्चा मार्ग खुला होत आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. अध्यक्ष बायडन यांनी चचेर्ला सहमती दर्शवली आहे. बायडन आणि पुतीन यांच्यात चर्चा होऊ शकते. पण रशियाने युक्रेनवर हल्ला करू नये, अशी अट व्हाईट हाऊसने घातली आहे.
दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान येत्या 23 फेब्रुवारीला रशिया दौऱ्यावर जात आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दोन दशकातील हा पहिलाच रशिया दौरा आहे. इम्रान खान यांच्या रशिया भेटीने काहीच फरक पडणार नाही. भारताला युद्ध नकोय शांतता हवी आहे. भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी युक्रेनमधील भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केला असून, सर्व भारतीयांना परत आणले जात आहेत. असे राजनाथ सिंह म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App