टीका – आरोप होत राहतात त्यांची फिकीर करु नका; शरद पवारांचा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना सल्ला!!


प्रतिनिधी

मुंबई : सार्वजनिक जीवनात माझ्यावर अनेक ठिकाणी आरोप झाले. मी त्यांची फिकीर केली नाही. मी काम करत राहिलो. राज्य सरकारने देखील धाडसी निर्णय घेऊन काम करत राहिले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.Sharad Pawar advises Mahavikas Aghadi government leaders

गोरेगाव मधील पत्रा चाळीच्या निवासस्थानाच्या भूमिपूजन कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. शरद पवार यांच्यासमवेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर होते.

शरद पवार म्हणाले :

  • घरांच्या प्रश्नासंबंधी राज्य सरकारला माझी एक सूचना आहे. सामान्य माणसांच्या घरांसोबतच पोलिसांच्या घरासंबंधीही सरकारने लक्ष द्यायला हवं. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलिसांच्या जुन्या निवासी जागा आहेत. ती घरे वाईट स्थितीत आहेत. जागा मोठ्या आहेत, मात्र घरे चांगल्या स्थितीत नाहीत.
  • पोलिस आपले रक्षक आहेत. दिवसाचे १६ तास ते काम करतात. त्यांच्या कुटुंबातील लोकांना चांगला निवारा मिळण्यासाठी आपण लक्ष घालू या. महाराष्ट्रातील गृह खाते आणि गृहनिर्माण खाते यांनी एकत्र बसून प्रस्ताव तयार करावा.
  • व्यावसायिक दृष्टीकोनातून, उत्पन्न साधनाचा विचार करून, या उत्पन्नातून पोलिसांना दर्जेदार घरे कशी देता येतील, याचा विचार करावा. माझी खात्री आहे, अशा पद्धतीने विचार केल्यास महाराष्ट्रातील विविध भागातील पोलिसांच्या कुटुंबांना समाधान लाभेल.
  • आज मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्यांचा मोठा प्रश्न आहे. त्याचे निवारण करण्यासाठी धाडसाने निर्णय घेण्याची गरज आहे. टीका टिप्पणी होईल, पण स्वच्छ कारभार करण्याचा आपला निर्धार असल्यानंतर आरोपांची चिंता करायची गरज नाही.
  • कारण आरोपांची चिंता करून आपण निर्णय घेण्यासाठी थांबलो तर त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाच्या विकासावर होत असतात. मी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत आहे. अनेक प्रकारचे उपक्रम राज्यात आणि देशात राबवले. कधी काळी टीका, आरोप झाले. पण त्याची फिकीर केली नाही.
  • अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आले नाही. त्यामुळे राज्य सरकारने हाती घेतलेला उपक्रम पूर्ण करावा. घरांच्या कामाला जास्तीत जास्त गती द्यावी. ज्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे, तिथे धाडसाने घ्यावा.
  • मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी धडाडीने निर्णय घेतील. महाराष्ट्रातील जनता राज्य सरकारच्या पाठिशी उभी राहील, याचा मला विश्वास आहे.

Sharad Pawar advises Mahavikas Aghadi government leaders

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात