वृत्तसंस्था
नवी दिल्ली : खार्किव आणि सुमी शहरात अडकलेल्या भारतीय आणि इतर देशांतील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशियाने एकशे तीस बस सज्ज केल्या आहेत. Russia arranges 130 buses for students; Prime Minister Narendra Modi’s discussion came to fruition
रशियाच्या राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल-जनरल मिखाईल मिझिंतसेव्ह यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलून युक्रेनमधील भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. रशियन नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरचे प्रमुख म्हणाले, आज पहाटे ६ वाजल्यापासून बेल्गोरोड प्रदेशातील नेखोत्येव्का आणि सुडझा पोस्टवरून एकूण १३० आरामदायी बस सज्ज ठेवल्या आहेत.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका केल्यानंतर भारत सरकार १० मार्चपर्यंत त्यांना मायदेशी आणणार आहे. दरम्यान, १८ हजार विद्यार्थी मायदेशी पोचले आहेत. आणखी ८० विमानांची उड्डाणे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या २४ मंत्र्यांवर त्यांची व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सोपवली आहे. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एकूण ३५ उड्डाणे येतील, ज्यात एअर इंडियाची १४, एअर इंडिया एक्सप्रेसची आठ, इंडिगोची सात, स्पाइसजेटची एक, विस्ताराची तीन आणि भारतीय हवाई दलाची दोन उड्डाणे आहेत. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एकूण २८ उड्डाणे करण्यात आली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App