RSS: धर्मांतर थांबायला हवे; संघ पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय बैठक


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोळे धर्मांतराच्या विषयावर भाष्य करतांना म्हणाले की, धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे असं संघाचे कायमच मत राहिलेलं आहे.RSS: Conversion must stop; The team is committed to protecting the environment A three-day meeting of the Rashtriya Swayamsevak Sangh


विशेष प्रतिनिधी

धारवाड : धर्मांतर थाबायला हवे आणि ज्यांनी धर्मांतर केले आहे, त्यांनी त्याबाबतची माहिती द्यायला हवी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. जर धर्मांतर विरोधी कायदा झाला तर त्याचे स्वागतच केले जाईल, असेही संघाने म्हटले आहे.

लोक धर्मांतर करतात. मात्र त्याची माहिती देत नाहीत. त्यामुळे ते दुहेरी लाभ घेत असतात, असे संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



धर्मांतर विरोधी कायद्याला अल्पसंख्यांकांकडून का विरोध होतो आहे, हे उघड आहे. फसवणूक करून अथवा अन्य कोणत्याही मार्गांनी धार्मिक आकडेवारी वाढवण्याचे प्रयत्न मान्य असू शकत नाहीत. केवळ संघानेच नव्हे तर महात्मा गांधींनीही धर्मांतराला विरोधच केला आहे.

देशातील 10 पेक्षा अधिक राज्यांमध्ये धर्मांतर बंदी कायदा करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशात वीरभद्र सिंह हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री असताना धर्मांतर बंदी विधेयक मंजूर केले गेले आहे. अरुणाचल प्रदेशमध्येही कॉंग्रेस सरकारच्याच काळातच धर्मांतर बंदी कायदा करण्यात आला होता. धर्मांतर करण्याचे स्वातंत्र्य पूर्वीपासूनच होते. मात्र आज जे होत आहे, ते स्वातंत्र्य नाही.

धर्मांतर बंदी कायद्याबाबत देशव्यापी चर्चा घडवून आणण्याची अपेक्षा माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनीही व्यक्त केली होती, असेही होसबाळे म्हणाले.कोणी स्वेच्छेने निर्णय घेत असेल तर गोष्ट वेगळी, पण तसे होत नाही. मग धर्मांतर करणारे दुहेरी लाभ कसे घेऊ शकतात?

आता पर्यंत 10 हून अधिक राज्यांच्या सरकारांनी धर्मांतरविरोधी विधेयके आणले आहेत. ही सर्व सरकारे भाजपची नाहीत. हिमाचल प्रदेशामध्ये वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने हे विधेयक फार पूर्वी मंजूर केले. अरुणाचल प्रदेश काँग्रेसने धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केले.

दिवाळीत फटाक्यांवर बंदी योग्य नाही’

तीन दिवसीय बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. महागाई- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, अपारंपरिक ऊर्जा/ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांच्या वापरावर, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज आसे विषय मांडले गेले.

संघ पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे, मात्र केवळ दिवाळीतच फटाक्यांवर बंदी घालणे हा प्रश्नावर उपाय नाही. इतर देशांमध्येही सणाच्या वेळी फटाके वाजवले जातात. अमेरिकेसारख्या देशात राष्ट्रीय दिनी न्यूयॉर्कमध्ये फटाके फोडले जातात.

फटाक्यांवर पूर्ण बंदी घातल्याने लाखो लोक बेरोजगार झाले आहेत आणि लोकांचा आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे फटाके बंदीचा निर्णय संबंधित मंत्रालय आणि पर्यावरणतज्ज्ञांशी चर्चा करूनच घ्यावा, असं ते म्हणाले.

मोहन भागवत काय म्हणाले?

संघाच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात लोकसंख्या धोरणाच्या अंमलबजावणीवर भर दिला. भागवत म्हणाले की, सर्वांना समान संधी मिळण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे, कारण नैसर्गिक साधनं मर्यादित आहे, त्यामुळे हे लक्षात घेऊन धोरण बनवणे आवश्यक झाले आहे.

या बैठकीत देशभरातून 350 लोक सहभागी

दोन वर्षांनंतर झालेल्या या बैठकीत देशभरातून संघाचे 350 महत्त्वाचे लोक सहभागी झाले होते.

RSS: Conversion must stop; The team is committed to protecting the environment A three-day meeting of the Rashtriya Swayamsevak Sangh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात