गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतील १००० रुपये, अनुदानही रद्द करण्याच्या सरकारच्या हालचाली; महागाईत जनतेला आणखी एक झटका बसणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरच्या अनुदानात कपात करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे सिलेंडरच्या किमती १ हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यायाने महागाईचा आणखी एक झटका सर्वसामान्य जनतेला बसण्याची शक्यता वाढली आहे.
केंद्र सरकारने गॅसवरील अनुदान संपुष्टात आणण्याच्या हालचालींना वेग दिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ग्राहकांना सिलेंडरसाठी १००० रुपये मोजावे लागतील. Rs.1000 for gas cylinder; The government’s move to cancel grants; There will be another blow to inflation

केंद्र सरकारने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनात ग्राहक सिलेंडरसाठी १००० पर्यंत पैसे मोजण्यास तयार असल्याचं समोर आले आहे. मात्र,केंद्राने अधिकृत माहिती दिली नाही. सिलेंडरच्या अनुदानासंबंधी सरकार दोन भूमिका घेण्याची शक्यता आहे. यानुसार सध्याच्या योजनेत एकतर बदल करणार नाही किंवा उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्या सक्षम नसणाऱ्या ग्राहकांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.



सरकारवरील अनुदानाचा भार कमी झाला

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सरकारने अनुदान म्हणून ग्राहकांना ३५५९ कोटी रुपये दिले होते. २०१९-२० मध्ये खर्चाचा हा आकडा २४ कोटी ४६८ होता. म्हणजेच सरकारने एका वर्षात अनुदानामध्ये सहापटीने कपात केली आहे.

अनुदानासाठी सध्याचा नियम काय?

सध्याच्या नियमानुसार, जर तुमचं वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची सुविधा मिळणार नाही. मे २०२० मध्ये काही ठिकाणी अनुदान बंद केले होते.

यंदा १९० रुपये ५० पैशांनी महागला गॅस

दिल्लीमध्ये १ जानेवारीला सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती. आता ८८४ रुपये ५० पैसे आहे. म्हणजेच जानेवारीपासून किंमतीत १९० रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे.

साडे सात वर्षात सिलेंडरची किंमत दुप्पट

गेल्या साडे सात वर्षात घरगुती गॅल सिलेंडरची (१४.२ किलो) किंमत दुप्पट झाली आहे. मार्च २०१४ ला १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ४१० रुपये ५ पैसे होती. ती आता ८८४ रुपये ५० पैसे आहे.

देशात २९ कोटी लोकांकडे कनेक्शन

भारतात जवळपास २९ कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. यामध्ये उज्ज्वला योजनेतील लोकांची संख्या आठ कोटींच्या आसपास आहे.

Rs.1000 for gas cylinder; The government’s move to cancel grants; There will be another blow to inflation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात