रोहिंग्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चेहरा मोहिबउल्ला यांची गोळ्या झाडून हत्या


विशेष प्रतिनिधी

ढाका – रोहिंग्या स्थलांतरीतांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणाऱ्या मोहिबउल्ला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. काही अज्ञात हल्लेखोरांनी कॉक्सबझार जिल्ह्यात असलेल्या मदत छावणीत मोहिबउल्ला यांच्यावर गोळ्या झाडल्या. Rohingya leader shot dead in Bangaladesh

मोहिबउल्ला हे व्यवसायाने शिक्षक होते. म्यानमारमध्ये होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून मोहिबउल्ला यांच्यासह सुमारे सात लाख रोहिंग्या मुस्लिम स्थलांतरीत झाले आहेत. बांगलादेशमध्येच बहुतांशी रोहिंग्या आश्रयाला आले आहेत. त्यांच्या प्रश्नां ना मोहिबउल्ला यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वाचा फोडली आहे.म्यानमारच्या लष्कराने रोहिंग्यांवर केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ त्यांनी ढाक्यात दोन लाख रोहिंग्यांचा मोर्चा काढला होता. या मोर्चावरून मोहिबउल्ला यांच्यावर टीकाही होत होती. त्यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने अथवा गटाने स्वीकारलेली नाही. या घटनेवर मानवाधिकार संघटनांनी टीका केली आहे.

Rohingya leader shot dead in Bangaladesh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण