नामांतराचे वारे पूर्व – पश्चिमेकडून दक्षिणेकडे; कर्नाटकात नागरहोळ नॅशनल पार्कचे नामांतर राजीव गांधींवरून करिअप्पांच्या नावे करण्याची मागणी


वृत्तसंस्था

बेंगळुरू – राजीव गांधी नामकरण आणि नामांतराचा वाद आता आसाम – महाराष्ट्रातून कर्नाटकात पोहोचला आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने पिंपरी – चिंचवडमधील नियोजित विज्ञान नगरीस राजीव गांधींचे नाव देण्याचे जाहीर केले आहे, तर तिकडे आसाममध्ये ओरांग नॅशनल पार्कच्या नावातून राजीव गांधी यांचे नाव हटविण्यात आले आहे.Renaming winds from east – west to south; Demand for renaming Nagarhol National Park in Karnataka after Rajiv Gandhi

यानंतर कर्नाटकातल्या राजीव गांधी नागरहोळ नॅशनल पार्कचे नामांतर कर्नाटकचे वीर पुत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल करिअप्पा यांच्या नावाने करावे, अशी मागणी भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांनी केली आहे.



प्रताप सिम्हा हे कर्नाटकातल्या म्हैसूर कोडागू मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. त्यांनी कर्नाटकाचे वनमंत्री उमेश व्ही कट्टी यांना पत्र लिहून नागरहोळ नॅशनल पार्कचे नामांतर करण्याची मागणी केली आहे.

फील्ड मार्शल करिअप्पा हे कर्नाटकचे सुपुत्र आहेत. देशाच्या संरक्षणक्षेत्रात त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे. ते फील्ड मार्शल हे सर्वोच्च पद भूषविणारे भारताचे पहिले सेनापती होते. त्यांचे नाव नागरहोळ नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्हला देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खासदार प्रताप सिम्हा यांच्या या मागणीमुळे मोठा वाद निर्माण होणार आहे. कारण आसाममधल्या ओरांग नॅशनल पार्कच्या नावातून राजीव गांधींचे नाव हटविल्याने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी त्यावर आक्षेप नोंदविला आहे. आसाममध्ये तर राजीव गांधींचे नाव हटले पण आता कर्नाटकातून तशीच मागणी एका खासदाराकडून पुढे आल्याने हा नामांतराचा वाद आणखी रंगण्याची राजकीय चिन्हे दिसत आहेत.

Renaming winds from east – west to south; Demand for renaming Nagarhol National Park in Karnataka after Rajiv Gandhi

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात