पंतप्रधानांनी दिल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा, वडीलांच्या अलीगढच्या मुस्लिम मित्राची सांगितली कहाणी, हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे उलगडले नाते


विशेष प्रतिनिधी

अलीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत वडीलांच्या अलीगढच्या मुस्लिम मित्राची कहाणी सांगितली. अलीगढच्या कुलुपांचे आपल्या गावातील नाते सांगत हिंदू- मुस्लिम बंधुभावाचा अनोखे नातेही उलगडले.Reminiscent of childhood memories given by the Prime Minister, the story of his father’s Muslim friendfrom Aligarh, Hindu-Muslim brotherhood unfolded

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीगढ येथे डिफेंस कॉरिडोर नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह स्टेट यूनिवर्सिटीचे भूमिपूजन केले. यावेळी अलीगढच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान म्हणाले, येथे आल्यावर बालपणीच्या आठवणींनी मन भरून आले आहे. लोक आपले घर आणि दुकानांच्या सुरक्षेसाठी अलीगढवर विसंबून होते.



कारण अलीगढचे कुलूप असेल तर चिंता नसायची. सुमारे ५५-६० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अलीगढच्या मुस्लिम कुलुपांचे एक मुस्लिम सेल्समन होते. ते दर तीन महिन्यांनी आमच्या गावात यायचे. काळे जाकीट परिधान केलेले असायचे. माझ्या वडीलांशी त्यांची खूप मैत्री होती. हे मुस्लिम सेल्समन आपली कुलुपे येथील व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी द्यायचे.

दर तीन महिन्यांनी विक्रीची रक्कम घेऊन जायचे. आसपासच्या गावातही ते फिरायचे. दिवसभर फिरून जे पैसे जमा व्हायचे ते माझ्या वडीलांकडे जमा करायचे. पाच-सहा दिवस सगळ्या गावांमध्ये फिरून पैैसे गोळा केल्यावर ते वडीलंकडून पैैसे घेऊन रेल्वेने पुन्हा अलीगढला जायचे.

पंतप्रधान म्हणाले, आमचे सीतापूर आणि अलीगढशी खूप नाते होते. डोळ्याच्या विकारावर उपचारासाठी गावातील लोक सीतापूरला जायचे. वडीलंच्या त्या मित्राकडून अलीगढबद्दल खूप माहिती मिळायची. आत्तापर्यंत आपल्या प्रसिध्द कुलुपांनी घरे आणि दुकानाचे रक्षण करणारे अलीगढ आता देशाच्या सीमांचे रक्षण करण्याचे काम केले आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजनेत उत्तर प्रदेश सरकार अलीगढची कुलुपे आणि हार्डवेअर यांना नवी ओळख देत आहे.

आपले जन्मस्थान असलेल्या कच्छचे अलीगढशी नाते सांगताना मोदी म्हणाले, पहिल्या महायुध्दाच्या काळात राजा महेंद्र प्रताप हे श्यामजी कृष्ण वर्मा आणि लाल हरदयाल यांना भेटण्यासाठी युरोपात गेले होते. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना ७३ वर्षांनंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी भारतात आणण्यात यश मिळाले.

कच्छमधील मांडवी येथील स्मारकात अस्थिकलश ठेवले आहे. आज देशाचा पंतप्रधान या नात्याने मला राजा महेंद्र प्रताप यांच्या दूरदर्शी आणि महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाच्या विद्यापीठाचे भूमिपूजन करण्याचे भाग्य लाभत आहे.२०१७ पूर्वी उत्तर प्रदेशात ज्या गुंड व माफिया यांची मनमानी चाललेली होती, ते आता तुरुंगात आहेत.

पूर्वी गुन्हेगारांच्या भीतीने लोकांना आपली घरे सोडून पलायन करावे लागत होते. अनेक परिवार घरातच कैद होते. योगी सरकारने या सगळ्या गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले आहे. आता राज्यात गुंतवणुकीस योग्य वातावरण बनले आहे. राज्य विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत आहे, अशा शब्दांत त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.

Reminiscent of childhood memories given by the Prime Minister, the story of his father’s Muslim friendfrom Aligarh, Hindu-Muslim brotherhood unfolded

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात