रिलायन्स जिओ 5 जी सेवा दिवाळीपासून सुरू; मुकेश अंबानींची घोषणा!!, वाचा तपशील!!


वृत्तसंस्था

मुंबई : रिलायन्स जिओ 2022 च्या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्त्यासह मेट्रो शहरे आणि मोठ्या शहरांमध्ये 5 जी सेवा लॉन्च करेल. डिसेंबर 2023 पर्यंत भारतातील सर्व शहरे, तालुके, तहसीलपर्यंत 5 जी सेवा पोहोचवेल, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज सीएमडी मुकेश अंबानी यांनी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या पाचव्या एजीएम मध्ये ते बोलत होते. Reliance Jio 5G service starts from Diwali

रिलायन्स जिओने जगभरातील सर्वात तेज 5 जी रोल आऊट प्लान तयार केला असून 2022 च्या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता या मेट्रो शहरांबरोबरच काही मोठ्या शहरांमध्ये 5 जी सेवा लॉन्च होईल. डिसेंबर 2023 पर्यंत भारताच्या प्रत्येक शहर, तहसील, तालुक्यापर्यंत ही सेवा वितरीत होईल असे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे.

5 जी सेवा सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक बाबींमध्ये उच्चतम गुणवत्तेशी जोडून घेईल. भारताला चीन आणि अमेरिकेपेक्षाही अधिक वेगाने डेटा संचलित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज प्रतिबद्ध आहे, असे मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले आहे.

Reliance Jio 5G service starts from Diwali

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!