सूक्ष्म लघु उद्योजकांची मुद्रा लोनची नियमित भरपाई; बँकांचा एनपीए नगण्य 3.38 %


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा लोन योजनेचा कोट्यावधी लघुउद्योजकांनी लाभ घेतला असून त्याच्या कर्जाची भरपाई देखील नियमित होत असल्याचे आकडेवारी नुसार स्पष्ट झाले आहे. एकीकडे अनेक बँकांचा एनपीए अर्थात नॉन परफॉर्मिंग असेट्स 6.% आसपास असताना दुसरीकडे मुद्रा लोन संदर्भातला एनपीए 3.38% एवढा नगण्य आहे. मुद्रा लोन घेणाऱ्या कर्जदारांच्या नियमित कर्जफेडीची चांगली क्षमता यातून स्पष्ट होते.  Regular repayment of Mudra Loans of Micro Small Entrepreneurs;

8 अप्रैल 2015 रोजी सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी ही मुद्रा लोन योजना सुरू झाली. या उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज वाटपातून याची सुरुवात झाली. या कर्जाची नियमित फेड करणाऱ्यांचे प्रमाण उत्तम आहे. संपूर्ण बँकिंग क्षेत्रामध्ये कर्जफेडीच्या अनियमिततेमुळे जो एनपीए तयार होतो त्यापेक्षा मुद्रा लोनचा एनपीए निम्म्याने कमी आहे. मुद्रा लोनच्या आकडेवारीनुसार 8 एप्रिल 2015 ते जून 2022 पर्यंत एनपीए किंवा बॅड लोन 46,053.39 कोटी रुपये आहे. हे प्रमाण केवळ 3.38 % आहे.

संपूर्ण बँकिंग सेक्टरमधील एनपीए मार्च 2022 च्या अखेरीस 5.97 % होता. वास्तविक कोविडमुळे गेल्या दोन वर्षात सूक्ष्म आणि लघु उद्योगाला फार मोठ्या प्रमाणावर फटका बसला गृहबांधणी क्षेत्रालाही हा फटका मोठाच होता परंतु तरीदेखील मुद्रा लोन ची परतफेड इतर बँकांच्या कर्जा पेक्षा चांगली राहिली हेच आकडेवारी स्पष्ट करते.

– बँकिंग सेक्टर मध्ये एनपीए सुधारणा

2021-22 मध्ये बँकिंग क्षेत्रातील एकूण एनपीएचे प्रमाण घटून ते 5.97 % झाले आहे. गेल्या 6 सहा वर्षांमध्ये हे घटलेले प्रमाण आहे. एनपीएचे प्रमाण 2020-21 : 7.3 %, 2019-20 : 8.2 %, 2018-19 : 9.1 %, 2017-18 : 11.2 %, 2016-17 : 9.3 %, 2015-16 : 7.5 % एवढे राहिले होते.

Regular repayment of Mudra Loans of Micro Small Entrepreneurs;

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण