विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत तब्ब्ल १२० वर्षात प्रथमच मे महिन्यातील उच्चांकी म्हणजे ११९.३ मिलीमीटर पाउस पडला यामुळे दिल्ली श्रीनगर, धर्मशालेपेक्षाही कमी तापमान नोंदवले गेले. या पावसामुळे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणल्या जाणाऱ्या दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीतही लक्षणीय घसरण झाली. Record brake rain in Delhi
दिल्लीचा वायु गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) ८४ वर घसरला. दिल्लीतील एक्यूआय वर्षात एरवीच्या काळात अनेकदा अनेकदा दीडशे ते दोनशेच्या घरात असतो आणि हिवाळ्यामध्ये तो ४०० ची पातळी ओलांडून अतिगंभीर श्रेणीमध्ये जातो. दिल्लीत १९०१ पासून हवामानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून म्हणजे गेल्या १२० वर्षांमध्ये महिन्यात एका दिवशी इतका पाऊस हा पहिल्यांदाच पडल्याचे आयएमडीने सांगितले आहे.
या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या आणि कोरोनाने ग्रासलेल्या दिल्लीकरांना काहीसा सुखद गारवा अनुभवायला मिळाला. आज दिल्लीचे कमाल तापमान १९.३ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आणि हादेखील एक विक्रम मानला जातो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App