मोदींची मातृवंदना : महाराष्ट्रातील २४ लाख गर्भवतींना तब्बल १००० कोटींची विक्रमी मदत!


वृत्तसंस्था

मुंबई : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून महाराष्ट्रातील २४ लाख गर्भवतींना १००३ कोटी रुपयांची विक्रमी मदत केली आहे. राज्यात २०१७ पासून योजना सुरु झाल्यापासून २४ ऑगस्ट २०२१ पर्यंतची ही आकडेवारी आहे. आता सप्टेंबरपासून गर्भवती नोंदणीसाठी राज्यात विशेष सप्ताह आयोजित केला जाणार आहे. Record Assistance Of Rs1000 Crore To Pregnant Women In The Maharashtra State

राज्यात माता व बालमृत्यू हा कळीचा विषय आहे. न्यायालयांनी याप्रकरणी अनेकदा आरोग्य विभागावर कठोर ताशेरे ओढले आहेत. तथापि माता-बालमृत्यू कमी व्हावेत, यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. खासकरून १६ आदिवासी जिल्ह्यात योजना राबविण्यात येत आहेत. गरोदरपणाच्या काळात माता कुपोषित राहू नये, यासाठी राज्यात २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ राबविण्यात येते.अनेकदा ग्रामीण व आदिवासी भागात अनेक गर्भवतीना शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावे लागते. यात अनेक महिलांना गर्भारपणा काळात तसेच प्रसुतीनंतर मजुरीचे काम करणे शक्य होत नाही. अशावेळी रोजगार बुडून माता व बाळ कुपोषित राहाण्याची शक्यता असते. दारिद्रय रेषेखालील तसेच रेषेवरील मतांसाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यास सुरुवात केली.

यात केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के तर राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के निश्चित केला आहे. या योजनेत गर्भवतीस तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येतात. दरवर्षी अशा महिलांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक मदत केली जाते. यासाठी उद्दिष्ट निश्चित केले आहे. गेल्या काही वर्षात उद्दिष्टापेक्षा कितीतरी जास्त गर्भवतींची नोंदणी करून मदत केल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली.

आजपर्यंत केलेली मदत

  • २०१७ ते २४ ऑगस्ट २०२१ पर्यंत सुमारे २४ लाख गर्भवतींना १००३ कोटीची मदत केली आहे.
  • २०१९-२० मध्ये आरोग्य विभागाने ६ लाख गर्भवतींना शोधून मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात ७ लाख ४८ हजार ३१८ महिलांना ३८१ कोटी ६९ लाख रुपये मदत केली.
  • २०१८- २०१९ मध्ये ६ लाख ३९ हजार महिलांना २२० कोटी २९ लाख रुपयांचे वाटप केले होते.
  • कोरोना काळात २०२०-२१ मध्ये ४ लाख ५२ हजार उद्दिष्ट होते. मात्र प्रत्यक्षात ५ लाख १० हजार ९०८ गर्भवतींना २६३ कोटी ३९ लाख रुपयांची मदत दिली.
  • २०२१-२२ मध्ये साडेचार लाख उद्दिष्ट निश्चित केले असून २४ ऑगस्टपर्यंत १ लाख ८० हजार गर्भवती महिलांना ९८ कोटी रुपयांची मदत केली.

सप्टेंबरमध्ये विशेष सप्ताहाचे आयोजन

गर्भवतींची जास्तीजास्त काळजी घेण्याच्या दृष्टीने १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत विशेष सप्ताह आयोजित केला आहे. या माध्यमातून जास्तीतजास्त गर्भवतीची नोंद केली जाणार आहे, असे आरोग्य संचालक
डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

Record Assistance Of Rs1000 Crore To Pregnant Women In The Maharashtra State

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती