ravi dahiya wins silver : भारतीय कुस्तीपटू रवी दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी लढताना त्याचा रशियन कुस्तिपटूकडून पराभव झाला. अंतिम सामन्यात रशियन कुस्तीपटू जावूर उगेवाने त्याला पराभूत केले. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये रौप्य पदक जिंकल्यावर हरियाणा सरकारने रवी दहियाला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रवी दहियाला 4 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासोबतच रवि दहियाच्या सोनीपतमधील नहरी गावात इनडोअर स्टेडियम बांधण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. ravi dahiya wins silver haryana government announced four core and indore stadium in sonipat
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : भारतीय कुस्तीपटू रवी दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी लढताना त्याचा रशियन कुस्तिपटूकडून पराभव झाला. अंतिम सामन्यात रशियन कुस्तीपटू जावूर उगेवाने त्याला पराभूत केले. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये रौप्य पदक जिंकल्यावर हरियाणा सरकारने रवी दहियाला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रवी दहियाला 4 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासोबतच रवि दहियाच्या सोनीपतमधील नहरी गावात इनडोअर स्टेडियम बांधण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
युवुगेवाने सुरुवातीचा गुण मिळवला, पण रवी दहियाने लवकरच स्कोअर 2-2 केला. यानंतर रशियन खेळाडूने पुन्हा आघाडी घेतली. रवी पहिल्या फेरीनंतर 2-4 ने पिछाडीवर होता. दुसऱ्या फेरीतही युवुगेवाने एक गुण मिळवत आपली आघाडी मजबूत केली. रवीला दुसऱ्या फेरीत फक्त दोन गुण जमा करता आले. अशाप्रकारे, रशियन पैलवान जावूर युवुगेवाने अंतिम सामना 7-4 ने जिंकून सुवर्णपदक जिंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू रवी दहियाचे अभिनंदन केले. पीएम मोदी म्हणाले, “रवी कुमार दहिया एक हुशार कुस्तीपटू आहे. त्याची लढण्याची भावना आणि दृढता उत्कृष्ट आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारताला त्याच्या यशाचा खूप अभिमान आहे.”
भारताचे कुस्तीतील हे दुसरे रौप्य पदक आहे. यापूर्वी सुशील कुमार लंडन ऑलिम्पिक 2012 च्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने टोकियो क्रीडा स्पर्धेत आपले दुसरे रौप्यपदक मिळवले. यापूर्वी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 49 किलो वजनी गटात दुसरे स्थान मिळवले होते आणि देशाला रौप्य पदक मिळवून दिले होते. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताकडे आता दोन रौप्य पदके आहेत.
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा हा भारताचा एकमेव खेळाडू होता. बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले.
ravi dahiya wins silver haryana government announced four core and indore stadium in sonipat
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App