राष्ट्रपती भवनात पार पडला नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2021 सोहळा


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : 2 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात अाली होती. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स इन स्पोर्ट्स या विभागाकडून या पुरस्कारांची घोषणा करण्यात अाली हाेती. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

Rashtrapati Bhavan hosts National Sports Awards 2021

आज प्रेसिडेंट रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड यावर्षी 12 स्पोर्ट्स पर्ससना देण्यात आला आहे. नीरज चोप्रा, रवी कुमार, लोव्हलीना बोरगोहैन, श्रीजेश पी आर यांच्यासह इतर आठ खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला आहे.

पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालील प्रमाणे,
नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लोव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), श्रीजेश पीआर (हॉकी), अवनी लेखरा (पॅरा नेमबाजी), सुमित अंतिल (पॅरा-अॅथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), कृष्णा नगर (पॅरा बॅडमिंटन), मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), आणि मनप्रीत सिंग (हॉकी).

यांपैकी शटलर कृष्णानगर यांच्या आईचे अकस्मात निधन झाल्यामुळे तो पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहू शकला नाही. पण त्याने ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत पुरस्कार मिळाल्या बद्दल आभार प्रदर्शित केले आहेत.


National Sports Awards 2021: नीरज चोप्रांसह या खेळाडूंना आज मिळणार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, राष्ट्रपती कोविंद करणार सन्मान


पुरुष हॉकी संघाने 2020 ऑलिम्पिकमध्ये केलेल्या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त टीमला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फक्त पीआर श्रीजेश आणि मनप्रीत सिंग या दोन खेळाडूंना सोडून बाकी सर्व टीमला अर्जुन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे,

अरपिंदर सिंग, सिमरनजीतकौर, शिखर धवन, भवानी देवी, मोनिका, वंदना कटारिया, संदीप नरवाल, हिमानी उत्तम परब, अभिषेक वर्मा, अंकिता रैना, दीपक पुनिया, दिलप्रीत सिंग, हरमन प्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, बिरेंद्र लाक्रा, सुमित, नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, गुरजंत सिंग, मनदीप सिंग, शमशेर सिंग, ललित कुमार उपाध्याय, वरुण कुमार, सिमरनजीत सिंग, योगेश कथुनिया, निषाद कुमार , प्रवीण कुमार, सुहाश यथीराज, सिंहराज अधना, भाविना पटेल, हरविंदर सिंग, आणि शरद कुमार.

लाइफ-टाइम श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार टीपी ओसेफ, सरकार तलवार, सरपाल सिंग, आशा कुमार आणि तपन कुमार पाणिग्रही यांना देण्यात आला. नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार राधाकृष्णन नायर पी, संध्या गुरुंग, प्रीतम सिवाच, जय प्रकाश नौटियाल आणि सुब्रमण्यम रमन यांना देण्यात आला आहे.

जीवनगौरवसाठी ध्यानचंद पुरस्कार लेखा केसी, अभिजीत कुंटे, दविंदर सिंग गर्चा, विकास कुमार आणि सज्जन सिंग यांना देण्यात आला.

Rashtrapati Bhavan hosts National Sports Awards 2021

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण