बलात्कारी बाबा नित्यानंदने त्याच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास घातली मनाई!

बलात्काराच्या आरोपावरून भारतातून पळून जाऊन इक्वडोरजवळ ‘कैलाश’ नावे नवा स्वयंघोषित देश वसविल्याचा दावा करणारा बाबा नित्यानंद याने आपल्या देशात पर्यटकांना येण्यास मनाई केली आहे. संपूर्ण जगात कोरोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले आहे. Rapist Baba Nityananda forbade tourists to come to his country!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बलात्काराच्या आरोपावरून भारतातून पळून जाऊन इक्वडोरजवळ ‘कैलाश’ नावे नवा स्वयंघोषित देश वसविल्याचा दावा करणारा बाबा नित्यानंद याने आपल्या देशात पर्यटकांना येण्यास मनाई केली आहे. संपूर्ण जगात कोरोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले आहे.

नित्यानंदने त्यासाठी आपल्या स्वत:च्या सहीने राष्ट्रपती आदेश काढल्याचे म्हटले आहे. या आदेशात म्हटले आहे की केवळ भारतातीलच नव्हे तर ब्राझील, युरोपियन युनियन आणि मलेशियातील नागरिकांना त्याच्या कैलाश देश असलेल्या बेटावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याने याबाबत केलेले ट्विट कैलाशसाठी राष्ट्रपतींचा आदेश आणि कार्यकारी आदेश असे म्हटले आहे. जगातील सर्व देशांच्या दुतावासांना त्याने ही ऑर्डर पाठविल्याचे म्हटले आहे.

एका साध्वीसोबतचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नित्यानंद याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे भारतातून पळून जाऊन त्याने इक्वेडोरजवळील एक बेट विकत घेतले.भारतापासून सोळा हजार किलोमीटर असलेल्या या बेटाला त्याने कैलाश असे नाव दिले आहे.

=

आपला देश हा जगातील एकमेव हिंदूराष्ट्र आहे,असे त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे या देशाचा स्वत:ची घटना, पासपोर्ट, पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ असल्याचेही त्याने म्हटले आहे. जगातील कोणाही हिंदूल येथील नागरिकत्व मिळू शकते, असे त्याने म्हटले आहे.

नित्यानंदने नुकत्याच काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की सर्व कैलाशवासी माझे आवाहन आहे की त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी. स्वत:ला क्वारंटाईन करून घ्यावे. सर्व स्थानिक कायद्यांचे पालन करावे.

Rapist Baba Nityananda forbade tourists to come to his country!


महत्वाच्या’ बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात