देशाची जीवनवाहिनी खऱ्या अर्थाने प्राणदायिनी बनली. कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनची कमतरता भासत असताना रेल्वेने आत्तापर्यंत २९६० मेट्रीक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन विविध राज्यांपर्यंत पोहचवला आहे.Railway became the lifeblood of the country and delivered 2960 metric tons of oxygen
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाची जीवनवाहिनी खऱ्या अर्थाने प्राणदायिनी बनली. कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनची कमतरता भासत असताना रेल्वेने आत्तापर्यंत २९६० मेट्रीक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन विविध राज्यांपर्यंत पोहचवला आहे.
भारतीय रेल्वेने आतापर्यंत २९६० मेट्रीक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यांना १८५ टँकरमध्ये वितरीत केला आहे. ४७ ऑक्सिजन एक्स्प्रेसने आतापर्यंत त्यांचा प्रवास पूर्ण केलेला आहे,
अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ही माहिती प्राप्त प्रसिद्ध होईपर्यंत, महाराष्ट्रात १७४ एमटी, उत्तर प्रदेशात ७२९ एमटी, मध्यप्रदेशमध्ये २४९ एमटी, हरयाणामध्ये ३०५ एमटी, तेलंगणात १२३ एमटी आणि दिल्लीत १३३४ एमटी ऑक्सिजन उतरवले गेले आहे. असे देखील सांगण्यात आले आहे.
सध्या १८ टँकर २६० एमटी ऑक्सिजनसह महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्लीच्या वाटेवर आहेत. अधिक भार असलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेस रात्रीनंतर प्रवासाला सुरूवात करणे अपेक्षित आहे. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारला पुढील आदेशापर्यंत दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायाालयाने दिला आहे. दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने करोना रुग्णांचे हाल होत आहेत. याठिकाणीही रेल्वे ऑक्सिजन पुरवित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App