वृत्तसंस्था
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची मुंबई प्रदेश काँग्रेसने 28 डिसेंबर रोजी रॅली आयोजित केली आहे. परंतु, पोलिसांनी तिला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून उद्या या प्रकरणावर सुनावणी होणे अपेक्षित आहे.Rahul Gandhi’s rally in Mumbai, Congress ran in the High Court against its own Maha Vikas Aghadi government
या संदर्भातला परवानगी अर्ज आधीच मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आला आहे. परंतु ते परवानगी का देत नाहीत हे त्यांनी सांगितलेले नाही, असे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसने पोलिसांना लेखी स्वरूपात दिले आहे की आम्ही महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या सर्व कोविङ नियमावलीचे पालन करू.
सर्व नियमावलीला अनुसरूनच ही रॅली आयोजित करण्यात येईल. परंतु तरी देखील पोलिसांनी अद्याप आम्हाला परवानगी का दिली नाही हे समजत नाही, त्यामुळेच मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने मुंबई हायकोर्टाकडे अर्ज केला आहे, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली आहे.
परवाच हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाची मुस्लिम आरक्षण रॅली चांदिवली पार पडली. तिला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शेकडो गाड्यांसह औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास केला होता.
We don't understand why permission is not given to us? If they're concerned about Covid, we have already told them in our letter that we'll adhere to Covid guidelines. Since there's not much time left, we had to approach the court for permission:Bhai Jagtap, Mumbai Congress chief pic.twitter.com/pWdMV4C0UP — ANI (@ANI) December 13, 2021
We don't understand why permission is not given to us? If they're concerned about Covid, we have already told them in our letter that we'll adhere to Covid guidelines. Since there's not much time left, we had to approach the court for permission:Bhai Jagtap, Mumbai Congress chief pic.twitter.com/pWdMV4C0UP
— ANI (@ANI) December 13, 2021
त्या वेळी अनेक ठिकाणी पोलिसांनी अडवून काही गाड्या माघारी पाठवल्या. परंतु, खासदार इम्तियाज जलील हे चांदिवलीला पोहोचले एआयएमआयएम पक्षाने विनापरवाना मुस्लिम आरक्षण घेतली.
त्यावेळी ओवैसी आणि जलील या दोन्ही खासदारांनी राहुल गांधींच्या रॅलीला परवानगी दिली, मग आम्हाला परवानगी का नाकारता?, असा सवाल केला होता. या रॅलीच्या मुद्द्यावरून खासदार असदुद्दीन ओवैसी आणि जलील यांच्यावर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अद्याप काँग्रेसच्या 28 डिसेंबरच्या रॅलीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने हायकोर्टात धाव घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App