भारत जोडो यात्रेचा परिणामी राहुल गांधींची लोकप्रियता वाढली, पण मोदींचा मोठा लीड पक्काच

प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे खासदार राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष सी व्होटर या संस्थेने सर्वेक्षणातून काढला आहे. मात्र, त्याच वेळी लोकप्रियतेच्या बाबतीत मोदींचे टक्केवारी राहुल गांधी यांच्या पेक्षा कितीतरी पुढे असून मोदींचा तो लीड कायम आहे. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधींपेक्षा तब्बल 29 % पुढे आहेत, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.
Rahul Gandhi’s popularity increased as a result of Bharat Jodo Yatra, but Modi’s big lead is certain



राहुल गांधींनी दक्षिणेतील कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात यात्रेचा तब्बल 16 दिवस मुक्काम असून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या मोठ्या जाहीर सभाही होणार आहेत. दक्षिणेतली 4 राज्ये कव्हर करून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर सी व्होटर या संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे.

आत्तापर्यंत ही यात्रा ज्या राज्यांमधून गेली आहे, म्हणजेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमध्ये राहुल गांधींची लोकप्रियता अर्थातच अप्रूव्हल रेटिंग वाढले आहे.

तामिळनाडू :

  • तामिळनाडू मध्ये यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींची लोकप्रियता 16.8 % होती. पण यात्रेनंतर ती 19.4 % वर पोहोचली आहे.
  • मात्र तामिळनाडूमध्येच 2022 च्या सुरुवातीला राहुल गांधींची लोकप्रियता 25.5 % होती, तर 2019 च्या सुरवातीला 40 % होती. मधल्या काळात हा ग्राफ खाली जाऊन पुन्हा एकदा वर येऊन आता तो 19.4 % वर येऊन ठेपला आहे.
  • राहुल गांधींची कामगिरी यात्रेच्या सुरुवातीला 42.5 % लोकांना काहीशी समाधानकारक वाटत होती. पण त्यामध्ये आता सुधारणा होऊन 45.2 % लोकांना समाधानकारक वाटते आहे.
  • राहुल गांधींच्या नेतृत्वावर च्या नाराजीतही घट झाली आहे 2022 च्या सुरुवातीला राहुल गांधींवर 24.8 % लोक नाराज होते तर यात्रेनंतर ही नाराजी 15.8 % पर्यंत खाली आली आहे.

 केरळ :

  • केरळमध्ये राहुल गांधींच्या कामगिरीवर आधी आधी 30.6 % लोक खुश होते पण यात्रेनंतर त्यात 6 % ची वाढ होऊन राहुल गांधींची लोकप्रियता 36.8 % पोहोचली आहे.
  • मात्र केरळमध्ये जानेवारी 2019 मध्ये राहुल गांधींचे लोकप्रियता तब्बल 53.3 % होती, तर 2022 च्या सुरुवातीला ती 34.3 % पर्यंत घसरली होती. पण आता 36.8% लोक राहुल गांधींवर प्रचंड खुश आहेत.
  • 25.8 % केरळींना राहुल गांधींची कामगिरी काहीशी समाधानकारक वाटत होती त्यामध्ये 2 % ची वाढ होऊन 27.7 केरळींना राहुल गांधींचे नेतृत्व काहीसे समाधानकारक वाटत आहे.
  •  राहुल गांधींच्या नेतृत्वावर 30.7 % लोक नाराज होते ही नाराजी आता कमी होऊन to 26.3 % आली आहे.

 कर्नाटक :

  • कर्नाटकात राहुल गांधींवर यात्रेपूर्वी 29.8 % लोक प्रचंड खुश होते. त्याचे प्रमाण वाढले असून आता 34 % कर्नाटकी लोक राहुल गांधींवर प्रचंड खुश आहेत.
  • राहुल गांधींची समाधानकारक कामगिरी मात्र कर्नाटकात एका टक्क्याने घसरली आहे. ती 26.7 % वरून 25.7 % खाली आली आहे.
  • अर्थात राहुल गांधींवरील नाखुशीचे प्रमाण देखील घटले आहे. यात्रेपूर्वी 24.3 % लोक नाखुश होते. आता 23.4 % लोक नाखुश आहेत.

तेलंगण :

  • तेलंगणात राहुल गांधींवर 29.1 % लोकप्रचंड खुश आहेत यात्रेपूर्वी हे प्रमाण 27.6 % एवढे होते.
  • राहुल गांधींची कामगिरी समाधानकारक आहे असे म्हणणारे प्रमाण 25.4 % होते, ते आता 28.5 % वर पोहोचले आहे.
  • तेलंगणा मधली नाराज लोकांचे प्रमाण मात्र फक्त 0.1% घटले आहे. आधी 29.6 % लोक नाराज होते, आता 29.5 % नाराज आहेत.

गुजरात

  • गुजरात मध्ये राहुल गांधींवर आधी 19.4 % प्रचंड खुश होते परंतु यात्रा सुरू झाल्यानंतर लोकप्रियत वाढ होऊन आता 24.2 % लोकप्रचंड खुश आहेत.
  • राहुल गांधींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करणाऱ्या लोकांचे प्रमाण मात्र घटले आहे. आधी 15.8 % लोक समाधानी होते. आता 14.2 % लोक समाधानी आहेत.
  • राहुल गांधींवरच्या नाराजीचे प्रमाण मात्र गुजरात मध्ये वाढले आहे. 2022 च्या सुरुवातीला 43.5% लोक राहुल गांधींवर नाराज होते यात्रेपूर्वी हे प्रमाण वाढून 53.9 % वर पोहोचले ते आता 53.4 % वर आले आहे.
  • अर्थात राहुल गांधींची लोकप्रियता वाढली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियत घट झाल्यामुळे राहुल गांधींची लोकप्रियता वाढली असे नाही, असा निष्कर्षही सी व्होटरच्या सर्वेक्षणात आला आहे.
  • गुजरात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 53% लोकप्रिय आहेत राहुल अरविंद केजरीवाल 18.3% लोकप्रिय आहेत तर राहुल गांधींचे एकूण लोकप्रिय त्याचे प्रमाण 9.7% आहे. बाकीचे नेते एकूणात 19 % आहेत.
  • पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना गुजराती जनतेने 57.4 % कौल दिला आहे, तर अरविंद केजरीवालांच्या बाजूने 16.3 % लोकांचा पाठिंबा आहे. राहुल गांधींना पंतप्रधान पदासाठी गुजरातच्या 13.5 % लोकांनी पसंत केले आहे.

हिमाचल प्रदेश

  • हिमाचल प्रदेशात यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी 16.2% लोकप्रिय होते. आता त्यामध्ये मोठी वाढ होऊन 32.5 % लोकांना त्यांची कामगिरी उत्तम अथवा समाधानकारक वाटते तर राहुल गांधींवरच्या नाराजीचे प्रमाण 65.3 % वरून घटून 54.4 % वर आले आहे.
  • एकूणात राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या द्विपक्षीय लढतीत नरेंद्र मोदी हे राहुल गांधींपेक्षा तब्बल 29 % पुढे आहेत.

Rahul Gandhi’s popularity increased as a result of Bharat Jodo Yatra, but Modi’s big lead is certain

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात