अशोक गेहलोत – सचिन पायलट : आधी बेकी, तर राहुलजींबरोबर चालताना एकी; पण भारत जोडो यात्रेनंतर पुन्हा एकी की बेकी?


विशेष प्रतिनिधी

कोटा : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रा राजस्थान मध्ये असताना काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात एकी झालेली दिसत आहे. पण ती एकी फक्त राहुल गांधीं बरोबर भारत जोडोच्या पदयात्रेत चालतानाच दिसत आहेत. Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra to Rajasthan sachin pilot ashok gehlot

अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे राहुल गांधींच्या उजव्या डाव्या बाजूला चालतात. यातून राहुल गांधी राजस्थानात काँग्रेसची कशी एकजूट आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. आज कोटामध्ये आणि परवा झालवाड मध्ये हे चित्र दिसले. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोन्ही नेते राहुल गांधीं बरोबर पदयात्रेत चालले.

पण हेच ते दोन नेते आहेत, ज्यांच्या मधून विस्तव जात नाही. अगदी भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात असताना देखील सचिन पायलट यांना अशोक गहलोत यांनी गद्दार म्हटले होते. गद्दार काय राजस्थानचा मुख्यमंत्री बनणार?, अशी खोचक संभावना त्यांनी केली होती. पण आता मात्र प्रत्यक्ष त्यांच्याच राज्यात म्हणजे राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा आल्यानंतर तेच अशोक गहलोत राहुल गांधीं बरोबर चालताना दुसऱ्या बाजूला सचिन पायलट चालताना पाहत आहे.

पण आता ही पदयात्रेतली एकी राहुल गांधींची यात्रा राजस्थानात असेपर्यंत टिकणार की ती यात्रा बाहेर राज्याच्या बाहेर गेल्याबरोबर पुन्हा या दोन्ही नेत्यांच्या एकीचे रूपांतर बेकीत होणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या दोन्ही नेत्यांच्या एकी किंवा बेकी राजस्थान काँग्रेसचे खऱ्या अर्थाने राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. 2023 च्या सुरुवातीला राजस्थानात विधानसभा निवडणुका आहेत.

त्यावेळी दोन नेत्यांमध्ये ही एकी टिकली तर काँग्रेसला भाजपची टक्कर घेणे तुलनेने सोपे जाईल. पण जर पुन्हा बेकी झाली तर मात्र राजस्थानात काँग्रेसचे अवघड आहे. मग भारत जोडो यात्रेला कितीही चांगला प्रतिसाद मिळाला तरी त्याचा लाभ उठवणारे संघटन मात्र मजबुतीने टिकणे आवश्यक आहे पण ते संघटन टिकवणे हेच खऱ्या अर्थाने भारत जोडो यात्रेनंतरचे राजस्थान काँग्रेसपुढे आव्हान असणार आहे.

Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra to Rajasthan sachin pilot ashok gehlot

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात