एकेकाळी मनमोहन सिंग सरकारचा अध्यादेश फाडणारे राहुल गांधी म्हणतात, मनमोहन सिंग सरकारचा कालावधी “गोल्डन पिरियड!!”


वृत्तसंस्था

उधम सिंह नगर (उत्तराखंड) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांना उपरती झाली आहे. किंबहुना ते थोडे नॉस्टॅल्जिक झाले आहेत. उत्तराखंड मधल्या उधमसिंग नगर मध्ये बोलताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द देशातील शेतकऱ्यांसाठी “गोल्डन पिरियड” होती, अशी स्तुतिसुमने राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्यावर उधळली आहेत. उधमसिंग नगर मध्ये शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.Rahul Gandhi, who once tore up the ordinance of Manmohan Singh government, says that the period of Manmohan Singh government is “Golden Period !!”Charity snatches Rs 50,000 help for wife Kareena’s death

हेच ते राहुल गांधी आहेत, ज्यांनी सन 2013 मध्ये भर पत्रकार परिषदेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या प्रति फाडल्या होत्या. त्यावेळी डागी त्यांना वाचविण्यासाठी आपल्याच सरकारने अध्यादेश काढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. डॉ. मनमोहन सिंग यांना तो अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी राजीनाम्याची तयारी केली होती, अशी आठवण त्यावेळचे सरकारचे आर्थिक सल्लागार मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी लिहिली आहे.



आपल्या सरकारच्या अध्यादेशाच्या चिंध्या करणाऱ्या राहुल गांधी यांनी आज उधमसिंग नगर मध्ये मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राहुल गांधी म्हणाले, की एकेकाळी देशात असे पंतप्रधान होते की ज्यांचे दरवाजे शेतकरी, कामगार, मजूर, छोटे व्यापारी यांच्यासाठी खुले होते. सर्व जण येऊन पंतप्रधानांची खुल्या दिलाने बोलू शकत असायचे. त्या अर्थाने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द “गोल्डन पिरियड” होती.

आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला राजासारखे मानत आहेत. त्यांच्या राज्यात शेतकरी, मजूर, कामगार, छोटे व्यापारी यांना स्थान नाही. त्यांचा आवाज मोदी ऐकतही नाहीत. मोदींना फक्त आपल्या भांडवलदार मित्रांचे भले करायचे माहिती आहे, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले आहे.

2013 ते 2022 एवढ्या 9 वर्षांमध्ये राहुल गांधी यांच्यात एवढे प्रचंड परिवर्तन झालेले दिसले आहे. ज्या पंतप्रधानांच्या सरकारचा अध्यादेश भर पत्रकार परिषदेत त्यांनी फाडून टाकला होता, त्याच पंतप्रधानांवर “गोल्डन पिरियडचे” पंतप्रधान अशा शब्दांमध्ये स्तुतीसुमने उधळण्याची वेळ राहुल गांधींवर आल्याचे दिसले आहे…!!

Rahul Gandhi, who once tore up the ordinance of Manmohan Singh government, says that the period of Manmohan Singh government is “Golden Period !!”Charity snatches Rs 50,000 help for wife Kareena’s death

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात