काँग्रेसच्या घटत्या देणग्या आणि राहुलजींचा भांडवलदारांविरुद्ध वाढता आवाज!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवर बोलताना भाषणात नेहमी एका मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करतात, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातला सगळा पैसा गरिबांकडून लुटून तो त्यांच्या दोन – तीन भांडवलदार उद्योगपती मित्रांना देतात. भारताची समस्या संपत्ती कमी आहे, ही नसून संपत्तीचे असमान वाटप ही आहे आणि त्यातही ही संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपती भांडवलदार मित्रांकडे कॉन्सन्ट्रेट होत आहे, ही मूळ समस्या आहे, असे शरसंधान राहुल गांधी साधत असतात. Rahul Gandhi targets Narendra Modi and industrialists in his bharat Jodo yatra speeches, is it due to major drop in donations to Congress?

राहुल गांधींच्या भाषणात भांडवलदारांचा उल्लेख फक्त एखाद दुसऱ्याच वेळेला येतो असे नाही, तर तो जवळजवळ प्रत्येक भाषणात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग राहुल गांधींच्या या भाषणाचे नेमके रहस्य काय आहे?? काँग्रेस सरकारे आत्तापर्यंत संमिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार होती, त्यावेळी काँग्रेसचे नेते भांडवलदारांच्या विरोधात इतक्या मोठ्या आवाजात बोलत होते का?? नेमकी त्यांची भूमिका काय होती??, याचा आढावा घेतल्यावर एक वेगळीच बाब समोर येत आहे, ती म्हणजे शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे “काँग्रेसच्या घटत्या देणग्या आणि राहुलजींचा भांडवलदारांविरुद्ध वाढता आवाज!!” ही ती बाब आहे.



काँग्रेस सह सगळेच राजकीय पक्ष विविध भांडवलदार उद्योगपतींनी दिलेल्या देणग्यांवर चालतात. या देणग्यांचा हिशेब कायद्यानुसार या सर्व पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. आयोगाने 8 राष्ट्रीय पक्षांच्या देणग्यांचा हिशेब जाहीर केला आहे. त्या हिशेबाकडे एक नजर टाकली, तर त्यातली आकडेवारी आपल्याला बरेच काही राजकीय गुपित सांगून जाते.

राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या अशा :

  •  सन 2021 – 2022
  •  भाजप : 614.53 कोटी रुपये
  •  कॉंग्रेस : 95.86 कोटी रुपये
  •  आम आदमी पार्टी : 44.54 कोटी रुपये
  •  मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी : 10.05 कोटी रुपये

बाकीचे सर्व पक्ष हे सिंगल डिजिट कोटीं मध्ये अथवा लाखांमध्ये आहेत. 20 हजार रुपयांपेक्षा जास्त एक रकमी देणगीची रक्कम आणि देणगीदारांची नावे या सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाला कायदेशीरदृष्ट्या कळवावी लागतात आणि त्यानंतर निवडणूक आयोग या सर्व पक्षांच्या देण्यांचा हिशेब जाहीर करतो.

वर उल्लेख केलेली देण्याच्या आकडेवारी बारकाईने पाहिली, तर भाजप इतर सर्व पक्षांपेक्षा कितीतरी पटीने पुढे दिसतो. काँग्रेस आणि भाजप मधले अंतर सहापटींपेक्षा जास्त आहे. राहुल गांधी हे भांडवलदार उद्योगपतींविरुद्ध जो आवाज बुलंद करत आहेत, त्याचे रहस्य काँग्रेसच्या या घटत्या देणग्यांमध्ये तर नाही ना??, असा सवाल आता सोशल मीडियावर अनेक जण करू लागले आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय सत्ता काळात त्या पक्षाला याच भांडवलदारांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत होत्या. पण काँग्रेस सत्तेवरून गेल्यानंतर या देणग्यांचे प्रमाण भरपूर घटल्याचे आकडेवारी सांगत आहे. त्यामुळेच तर राहुल गांधींचा भांडवलदारांविरुद्धचा आवाज मोठा तर झाला नाही ना??, या सवालाचे उत्तर काँग्रेसकडून येणे अपेक्षित आहे.

Rahul Gandhi targets Narendra Modi and industrialists in his bharat Jodo yatra speeches, is it due to major drop in donations to Congress?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात