इंधन दरवाढीतून मिळालेले २४ लाख कोटी कुठे गायब – राहुल गांधी यांचा मोदी सरकारला सवाल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींसाठी जीडीपीत वाढ म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ आहे अशी खिल्ली राहुल गांधींनी उडविली. इंधन दरवाढीतून सरकारने कमावलेले २४ लाख कोटी रुपये गेले कुठे असा सवालही केला. Rahul Gandhi targets Modi Govt. on gas price

अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना कळत नाही. या भयंकर अपयशाबद्दल नीती आयोगातील तज्ज्ञ बोलत नसतील, तर सरकारला समजावण्यासाठी काँग्रेसचे तज्ज्ञ पाठवतो, अशी खिल्ली राहुल गांधींनी उडविली.



युपीएच्या काळात गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दराशी आजच्या दराची तुलना करून करताना राहुल गांधींनी अर्थव्यवस्थेवर भयंकर संकट असल्याचा दावा केला. युपीएच्या काळात ४१० रुपयांना असलेल्या गॅस सिलिंडरच्या दरात ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तशाच प्रकारे पेट्रोलच्या दरात ४२ टक्क्यांनी तर डिझेलच्या दरात ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर युपीएच्या काळात १०५ डॉलर प्रतिपिंप असलेले दर आता केवळ ७१ डॉलर प्रतिपिंप आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होत असताना सरकार इंधनाचे दर वाढवत असून या इंधन दरवाढीतून सरकारने २३ लाख कोटी रुपये कमावले. हा पैसा कुठे गेला असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला.

Rahul Gandhi targets Modi Govt. on gas price

महत्त्वाच्या बातम्या

वाचकहो, आम्ही नतमस्तक आहोत! TheFocusIndia ची उत्तुंग भरारी.. २ कोटी वाचकांचा टप्पा अल्पावधीतच पार!!

मुळा – मुठा नद्या गटारगंगा का झाल्या; पुणे- पिंपरी-चिंचवड महापलिकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने झापले; संडपाण्यातून झालेल्या प्रदूषणावरून बजावली आठवी नोटीस

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरावर तरुणीकडून दगडफेक

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरावर तरुणीकडून दगडफेक

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात