वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे वर्षभरापासून बंद असलेल्या शाळा आता काही राज्यांत सुरू होत आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान यासारख्या राज्यांत कडक नियमांबरोबर शाळा सुरू करण्यात येत आहेत. कोविड काळात ऑनलाइन शाळा सुरू राहिल्या. परंतु प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याने मुलांत अधिक उत्साह दिसून आला. मात्र पालकांत अजूनही धास्ती जाणवत आहे. Schools opend in some states including Delhi, UP, MP etc
उत्तर प्रदेशात आजपासून पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू झाल्या. मुलांच्या स्वागतासाठी रंगबिरंगी कार्टून आणि फुग्यांनी शाळा सजवली. तत्पूर्वी मुलांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. मध्य प्रदेशात सहावी ते आठवीपर्यंत ५० टक्के क्षमतेने शाळा सुरू झाल्या. नवी दिल्लीत ९ ते १२ वी पर्यंत शाळा सुरू झाल्या. राजस्थानात सुमारे साडेचार महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या. सध्या ९ ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सम-विषम फॉर्म्युल्यानुसार प्रवेश दिला आहे. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्यात आले.
राज्य सरकारांनी शाळांना कोविड नियमांचे पालन करण्याची सक्त ताकीद दिली आहे. कोरोना संसर्गाच्या प्रकरणात घसरण होत असल्याने देशातील अनेक राज्यात शाळा सुरू झाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App