विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशातील शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे आक्रमण सुरू आहे. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. गृह राज्यमंत्र्यांचे, त्यांच्या मुलाचे नाव समोर येते आहे. या सरकारमध्ये शवविच्छेदनही योग्य प्रकारे होत नसून सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जात आहे अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.Rahul Gandhi targets Govt. on farmers issue
या प्रकरणात सरकार विरोधकांच्या दबावानंतरच कारवाई करेल, असा टोला लगावताना प्रसारमाध्यमे सरकारला प्रश्न विचारण्याचे काम विसरले आहेत, अशा शब्दात माध्यमांनाही लक्ष्य केले. राहुल म्हणाले, विरोधी पक्षाचे काम दबाव वाढविण्याचे असते.
त्यानंतर सरकार कामाला लागते. हत्या करणाऱ्यांचा बचाव व्हावा आणि विरोधकांचा दबाव येऊ नये हीच सरकारची इच्छा असल्याचा आरोप करताना राहुल गांधींनी हाथरस येथील बलात्काराच्या घटनेचे उदाहरण दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App