राहुल गांधीच्या वायनाडमध्ये कॉंग्रेसला लागली गळती, पक्षात राजीनामासत्र सुरूच


विशेष प्रतिनिधी

वायनाड – काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेससाठी व्हीआयपी असलेल्या मतदारसंघात पक्षाला चांगलेच हादरे बसू लागले आहेत.Congress shatters in Waynad

जिल्हा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष पी.व्ही.बालचंद्रन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. वायनाडमध्ये काँग्रेसमधील राजीनामासत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे माजी आमदार के.सी.रोसाकुट्टी, जिल्हा सरचिटणीस एम.एस.विश्वनाथन आदींनी राजीनामा दिला.



या पार्श्वभूमीवर बालचंद्रन यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.बालचंद्रन गेली तब्बल ५२ वर्षे काँग्रेसमध्ये होते. ते म्हणाले, केवळ बहुसंख्यांकच नव्हे तर अल्पसंख्यांकही काँग्रेस सोडत आहेत. ते दिशा गमावलेल्या पक्षाबरोबर राहू शकत नाहीत.

Congress shatters in Waynad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात