नॅशनल हेराल्ड केस : 2000 कोटींच्या भ्रष्टाचारात ईडी चौकशीला सामोरे जातानाही राहुल गांधी समर्थकांचा सावरकरद्वेष!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड केस मध्ये 2000 कोटींचा भ्रष्टाचार प्रकरणात काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी केली आहे. त्या विरोधात काँग्रेसने देशभर निदर्शने करून मोठा राजकीय गदारोळ केला आहे. परंतु या गदारोळात वेगवेगळे फलक झळकवून काँग्रेसने आपल्या हलक्या मनोवृत्तीचे दर्शनही घडवले आहे. Rahul Gandhi supporters hate Savarkar even while facing ED probe into Rs 2000 crore corruption

राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी फलक झळकवताना “हे राहुल गांधी आहेत, राहुल सावरकर नाहीत. ते माफी मागणार नाहीत”, असे फलकही काँग्रेस कार्यकर्त्यांनी झळकवले. सावरकर प्रेमींनी काँग्रेसच्या या हीन मनोवृत्तीचा तीव्र निषेध केला आहे.

राहुल गांधी यांना ईडीचे समन्स मिळाल्यापासून ते काही दिवस परदेशात होते. भारतात परतल्यावर त्यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी याविषयी दिल्लीत बॅनरबाजी करून वीर सावरकरांविषयी असलेला द्वेषाचे गरळ ओकले. वीर सावरकर यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना ब्रिटिशांना दिलेल्या आवेदनाचा राहुल गांधी यांनी  याआधीही वारंवार उल्लेख करत त्यांच्यावर अवमानकारक टिपण्णी केली होती. आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही हाच कित्ता गिरवला आहे. राहुल गांधी आणि वीर सावरकर यांची तुलना करून काँग्रेसने स्वतःचे हसे करून घेतले आहे, अशी प्रतिक्रिया समाजात उमटू लागली आहे.

– सावरकर प्रेमींचे काँग्रेसला टोले

हो, राहुल गांधी सावरकर नाहीतच. सावरकर होण्यासाठी ब्रिटिशांशी लढता-लढता 50 वर्षे काळे पाण्याची शिक्षा ओढवून घ्यायला लागते. क्रांतिकारकांना स्वातंत्र्याची प्रेरणा द्यावी लागते, स्वतःच्या संसाराची देशाच्या स्वातंत्र्यासाठी राख रांगोळी करून घ्यावी लागते. खूप प्रतिभा लागते, महाकवी असावे लागते. उत्कृष्ट निबंधकार असावे लागते, प्रत्यक्ष कृतीतून सुद्धा समाजक्रांती करावी लागते. इतिहासावर आणि पुढील पिढ्यांवर आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवावा लागतो. स्वतंत्र भारतात सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप लागून चौकशीला सामोरे जाणाऱ्यांना सावरकर होणे अशक्य गोष्ट आहे. एक वेळ साधा काजवा सुद्धा प्रकाशामुळे सूर्याशी खूप दूरचे का होईना नाते सांगू शकेल पण चिलटाला तो सुद्धा अधिकार नाही. राहुल गांधींचे नाव सावरकर नाही हे आमचे भाग्यच आहे. : चंद्रशेखर साने, वीर सावरकर साहित्य अभ्यासक, इतिहासकार

५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला ‘तुमचे राज्य तरी ५० वर्षे टिकेल काय?’ असे भर न्यायालयात ठणकावून विचारणारे वीर सावरकर, आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे. राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या, आगे आगे देखो होता है क्या.. : चित्रा वाघ, भाजप, प्रदेश उपाध्यक्ष

Rahul Gandhi supporters hate Savarkar even while facing ED probe into Rs 2000 crore corruption

विशेष प्रतिनिधी 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात