ट्विटरराव राहूल गांधी पुन्हा तोंडावर पडले, मुस्लिम ज्येष्ठाला मुस्लिम तरुणांनीच मारले, उत्तर प्रदेशची बदनामी करून का म्हणून योगींनी सुनावले

राजकारण म्हणजे ट्विट करणे असे मानणारे कॉँग्रेसचे खासदार पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. एका मुस्लिम ज्येष्ठाला जय श्रीराम म्हणायला लावण्यासाठी मारहाण झाल्याच्या फेक न्यूजवरून या ट्विटररावांनी ट्विट केले. मात्र, ही मारहाण मुस्लिम तरुणांनीच केली असल्याचे उघड झाले आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करणाºया अल्ट न्यूजच्या रिपोर्टरनेही व्हिडीओ मागे घेतला आहे.Rahul Gandhi fell on his face again, Muslim elder was beaten by Muslim youth


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजकारण म्हणजे ट्विट करणे असे मानणारे कॉँग्रेसचे खासदार पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. एका मुस्लिम ज्येष्ठाला जय श्रीराम म्हणायला लावण्यासाठी मारहाण झाल्याच्या फेक न्यूजवरून या ट्विटररावांनी ट्विट केले. मात्र, ही मारहाण मुस्लिम तरुणांनीच केली असल्याचे उघड झाले आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अल्ट न्यूजच्या रिपोर्टरनेही व्हिडीओ मागे घेतला आहे.

गाझीयाबादजवळील लोणी बॉर्डर परिसरात रिक्षामध्ये बसलेल्या वृद्ध व्यक्तीला जय श्री राम न बोलल्यामुळे मारहाण केल्याची घटना ५ जून रोजी घडल्याची फेक न्यूज चालविली जात होती. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापू लागले.ही संधी साधून राहूल गांधी यांनी एक ट्विट केले. त्यांनी म्हटले की, मी हे मानायला तयार नाही की श्रीरामे खरे भक्त असे काही करु शकतात. अशी क्रूरता मानवतेपासून खूप दूर आहे आणि समाज आणि धर्म दोघांसाठी लज्जास्पद आहे

मात्र, राहूल गांधी यांनी हे ट्विट केल्यानंतर त्यांना चांगलेच तोंडावर पडावे लागले. कारण मुस्लिम ज्येष्ठाला मारहाणीचा कथित व्हिडीओ व्हायरल करणाºया अल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेर याने डिलीट केला. त्याने म्हटले आहे की, माझे पोलीस आणि इतर पत्रकारांशी बोलणे झाले आहे.

त्यानुसार दिसून आले आहे की या मुस्लिम ज्येष्ठाला जय श्रीराम म्हटले नाही म्हणून मारहाण झाली हे खरे नाही. त्यामुळे माझा व्हिडीओ मी डिलीट केला आहे.मात्र, उत्तर प्रदेश पोलीसांनी मोहम्मद झुबेर याच्यावर कायदेशिर कारवाई सुरू केली आहे. अब्दुल समद सैफी नावाच्या एका ज्येष्ठ मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट केला होता.

सैफी यांनी म्हटले होते की, मी आॅटोरिक्षाने जात होतो तेव्हा माझ्यासमोर बसलेल्या दोन व्यक्तींनी माझे अपहरण केले. ते मला घेऊन एका जंगलाच्या ठिकाणी गेले आणि मला मारहाण करण्यास सुरवात केली. मी त्यांना सोडण्याची विनंती करत राहिलो. त्यांनी मला वारंवार जय श्री राम जप करण्यास सांगितले. त्यांनी माझ्या पाठीवर मारले आणि त्यांनी जय श्री राम म्हणायला पाहिजे, असे म्हणायला सांगितले

मात्र, वास्तविक हा वाद हिंदू-मुस्लिम यांच्यातील नसून सैफी विकत असलेल्या ताईतवरून होता. सैफी हा या युवकांना भविष्य उजळेल म्हणून ताईत विकत होता. मात्र, त्यामुळे या युवकांच्या जीवनात काहीही फरक पडला नव्हता. पोलीसांनी या प्रकरणी प्रवेश गुर्जर, कल्लू, पोली, आरिफ, आदिल आणि मुशाहीद या पाच जणांना अटक केली आहे.

मारहाणीत तीन मुस्लिम युवकांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाल्याने या वादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न मोहम्मद झुबेर आणि त्यानंतर राहूल गांधी यांनी केला.राहूल गांधी यांच्या या फेक न्यूजवरील ट्विटवरून हल्लाबोल करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, भगवान श्री रामांचा पहिला धडा म्हणजे सत्य बोला जे तुम्ही आयुष्यात कधीच केले नाही.

पोलिसांनी खरी माहिती दिल्यानंतरही तुम्ही समाजात विष कालवण्यात गुंतलेले आहात याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेच्या लोभात माणुसकीचा अपमान होत आहे. उत्तर प्रदेशातील लोकांचा अपमान करणे आणि त्यांची बदनामी करणे थांबवा.केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनीही यावरून राहूल गांधींवर टिकास्त्र सोडले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ज्यांच्या पक्षाने प्रतिज्ञापत्र करून भगवान राम यांचे अस्तित्वच नाकारले आहे, जो स्वत: हिंदूंना दहशतवादी म्हणाला आहे तोच आज भगवान राम यांच्या नावाला बदनाम करत आहे. या महाशयांनी एफआयआरची कॉपी वाचून काही नावे पाहिली असती तर व्होट बॅँकच्या मोहात असे ट्विट करण्याची हिंमत झाली नसती.

Rahul Gandhi fell on his face again, Muslim elder was beaten by Muslim youth

महत्त्वाच्या बातम्या