विशेष प्रतिनिधी
वर्धा : कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांचाच कॉँग्रेस जनांवर विश्वास राहिलेला नाही. आपणच आपली विचारधारा बाजुला ठेवल्याने भाजप आणि संघ यांनी कॉँग्रेसच्या विचारधारेला झाकोळले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.Rahul Gandhi does not trust the Congressmen, he said, adding that the BJP and the Sangh have covered up the Congress ideology by keeping him aside.
सेवाग्राम इथे काँग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराला आज सुरुवात झाली. देशभरातील ३० राज्यातील काँग्रेसचे २०० निवडक पदाधिकारी या शिबीरात सहभागी झाले आहेत. चार दिवस विविध वक्ते या शिबिरात सहभागी पदाधिकाºयांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराची सुरुवात पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाने झाली.
राहूल गांधी म्हणाले, काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. पण आपण आपलीच विचारधारा काहीशी बाजुला ठेवली आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आक्रमकपणे आपल्याच लोकांमध्ये मांडली जात नाही. यासाठी सातत्याने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. भाजप आणि संघ यांनी काँग्रेसच्या विचारधारेला झाकोळले आहे. त्यांच्या हातात व्यवस्था आहे.
आजच्या भारतात विचारधारेची लढाई ही सर्वात महत्त्वाची आहे. विचारधारेचे प्रशिक्षण हे पक्षात सक्तीचे केले पाहिजे. काँग्रेसची कोणताही व्यक्ती वरिष्ठ असो किंवा कनिष्ठ असो हे प्रशिक्षण सक्तीचे असले पाहिजे. हे प्रशिक्षण वेगवेगळ्या स्तरावर राबवले गेले पाहिजे.
राहूल गांधी म्हणाले, जेव्हा काँग्रेसची विचारधारा पसरते तेव्हा व्यक्तिमधील दु:ख आणि भय नाहीसं करते. आता वेळ आली आहे की ती मजबूत करण्याची. भाजपच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे चेहरे बघा आणि काँग्रेसचे चेहरे बघा. आपल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असते. तर त्यांचे चेहरे हे सुडाने भरलेले असतात. तुम्ही जे कराल ते प्रेमाने करा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App