या मोर्चाची सुरुवात क्रांतीचौक येथून होणार असून, शहरातील गुलमंडी परिसरात मोर्चाची सांगता होणार आहे.Shiv Sena’s grand march against inflation in Aurangabad under the leadership of Sanjay Raut
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : देशात वाढलेली महागाई, गगणाला भिडलेल्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती यासह अन्य दरवाढीच्या विरोधात शिवसेना आता आक्रमक झाली आहे. दरम्यान आज ( १३ नोव्हेंबर ) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने महागाईविरोधात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान या मोर्चाची सुरुवात क्रांतीचौक येथून होणार असून, शहरातील गुलमंडी परिसरात मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चानंतर संजय राऊत सभा घेणार आहेत.तसेच या मोर्चाला शिवसेना मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांची उपस्थिती असणार आहे.
pic.twitter.com/JkZOOpRSxu — Sanjay Raut (@rautsanjay61) November 11, 2021
pic.twitter.com/JkZOOpRSxu
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 11, 2021
मोर्चाच्या पार्श्भूमीवर अंबादास दानवे म्हणाले…..
मोर्चाच्या पार्श्भूमीवर बोलताना दानवे म्हणाले की, केवळ इंधन दरवाढीवर अवलंबून वस्तूंच्याच दरात वाढ झाली नाही तर मोबाइल फोनचे रिचार्ज, एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतही अधिक पैशांची कपात होत आहे. तसेच पेट्रोल महाग झाले , डिझेल महाग झाले ,
गॅस महागला, आणि उरलेसुरले अत्यावश्यक वस्तुंचे दर देखील गगणाला भिडले मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.म्हणून याचाच निषेध करण्यासाठी आम्ही 13 नोव्हेंबरला शिवसेना संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरणार असल्याचे दानवे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App