विशेष प्रतिनिधी
भिवंडी : कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या खटला आता जलद गतीने चालणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची चिन्ह आहे. मात्र, राहूल गांधी यांना त्यासाठी उपस्थित राहावे लागणार असल्याची शक्यता आहे.Rahul Gandhi case to be heard soon, may has to appear in court dailly
खासदार राहुल गांधी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत महात्मा गांधी यांची हत्या आरएसएस कार्यकर्त्यांनी केल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.
यावर आज झालेल्या सुनावणीवर प्रलंबित दाव्याची भिवंडी न्यायालयतच जलदगतीने 5 फेब्रुवारीपासून दररोज सुनावणी केली जाणार असल्याचे आदेश भिवंडी न्यायालयाचे न्यायाधीश जे व्ही पालीवाल यांनी दिले आहे.
भिवंडी न्यायालयामध्ये आरएसएस विरुद्ध राहुल गांधी मानहानी प्रकरणाबाबत सुनावणी चालू असतांना फियार्दी तर्फे अॅड. प्रबोध जयवंत व आरोपीतर्फे अॅड. नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. भिवंडी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. न्यायाधीश पलीवाल यांच्या न्यायालयासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने सादर केसमध्ये 5 फेब्रुवारी 2022 अशी तारीख नेमलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निवार्ळा देत सदर केसची 5/2/22 रोजी पासून सदरचा खटल्यामध्ये प्रत्यक्षपणे दैनंदिन सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत, अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील वकील अय्यर यांनी दिली. त्यामुळे गेल्या 7 वषार्पासून सुरू असलेल्या मानहानी दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App