भारतीय हवाई दल पुढील वर्षी होणार आणखी सुसज्ज, ३६ राफेल विमाने होणार समाविष्ट

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद  : भारतीय हवाई दलामध्ये २०२२ पर्यंत ३६ राफेल विमाने समाविष्ट होतील, असे हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी सांगितले.Raffel will add in air force next year

फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्यासाठी भारत सरकारने २०१६ मध्ये ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही पुढील वर्षीच्या एप्रिलअखेरपर्यंत सगळी विमाने हवाई दलामध्ये सहभागी होतील असे म्हटले आहे.



भदौरिया म्हणाले, बरीच विमाने वेळेच्या आधी भारतामध्ये दाखल झाली आहेत. ही विमाने नेमकी कधी सक्रिय होणार याची माहिती आपणा सर्वांनाच आहे, वेळेचा विचार केला तर आम्ही वेळ पाळली आहे. लडाखमधील स्थितीबाबत सध्या दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू आहे.

संघर्षस्थळापासून दोन्ही देशांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचा पहिला प्रयत्न हा बोलणी सुरू ठेवणे हाच आहे आणि दुसऱ्या बाजूने माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्यक्ष जमिनीवर नेमक्या काय हालचाली घडत आहेत यावर देखील आमचे बारकाईने लक्ष आहे.

Raffel will add in air force next year

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात