वृत्तसंस्था
मॉस्को : रशिया आणि युक्रेन युद्ध रोखण्यास रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांचा स्पष्ट नकार दिला असून जागतिक नेत्यांचे शांतीस्थापन करण्याचे आवाहन पुन्हा फेटाळले आहे. Putin’s outspoken refusal to stop the war is a blow to world leaders’ call for peace
दोन्ही देशामध्ये घनघोर युद्ध सुरू आहे. त्यात मोठी हानी झाली आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. २५ लाख युक्रेनियन नागरिक युद्धामुळे निर्वासित झाले आहेत. युक्रेनमधील प्रमुख शहर बेचिराख होण्याच्या मार्गावर आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युद्ध मागे घेण्यास नकार दिला आहे. हे युद्ध थांबवावे, असे आवाहन जगभरातून केले जात आहे. पण रशियन राष्ट्राध्यक्ष युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नाहीत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, शांततेच्या आवाहनाचा रशियावर कोणताही परिणाम होत नसल्याचे म्हटले आहे.
चर्चेत काय झाले ?फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘युक्रेनच्या अणू प्रकल्पाला लक्ष्य करू नका’, असे आवाहन केले. यावर पुतिन यांनी सांगितले की, युक्रेनच्या अणू प्रकल्पावर आक्रमण करण्याचा माझा हेतू नाही. बिघडलेल्या परिस्थितीमध्ये रशियन सैन्य राजधानी कीव जवळ पोहोचले आहे. शनिवारी कीवच्या आसपासच्या भागात जोरदार गोळीबार झाला. क्षेपणास्त्रांनी वासिलकिव्ह येथील एअरबेस आणि शस्त्रास्त्र डेपोवर आदळली आणि त्यांचा नाश केला. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियन सैन्य राजधानी कीवपासून २५ किमी ईशान्येस आहे. रशियन सैन्याने खार्किव, चेर्निहाइव्ह, सुमी आणि मारिओपोलला वेढा घातला. युक्रेनचे सैन्य आघाडीवर उभे आहे, पण हीच परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत रशियन फौजा कीवपर्यंत पोहोचतील. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दावा केला की, रशियाला नवीन सैन्य पाठवण्यास भाग पाडले गेले कारण त्यांच्या सैनिकांनी आतापर्यंत रशियाच्या ३१ बटालियनला चिरडले आहे. रशियाचे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे नुकसान असल्याचा दावा त्यांनी केला. या युद्धात युक्रेनचे १३०० हून अधिक सैनिकही मारले गेले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App