गँगस्टर मुख्तार अन्सारीला घेऊन यूपी पोलीस पंजाबमधून उत्तर प्रदेशाकडे रवाना, मुख्तारला बांदा जेलमध्ये ठेवणार

वृत्तसंस्था

रूपनगर जेल – कुख्यात गँगस्टर आणि बहुजन समाज पार्टीचा उत्तर प्रदेशातला माजी आमदार मुख्तार अन्सारीला घेऊन उत्तर प्रदेश पोलीस अखेर पंजाबमधून निघाली आहेत. बऱ्याच मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेश पोलीसांच्या हाती लागला आहे. सुप्रिम कोर्टाने मुख्तारला उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात दिलेच पाहिजे, असे आदेश पंजाब सरकारला काढल्यानंतर पंजाब पोलीसांना मुख्तारचा ताबा उत्तर प्रदेश पोलीसांकडे देणे भाग पडले. Punjab: A team of UP Police leaves from Rupnagar jail with gangster-turned-politician Mukhtar Ansari, for Banda.

अखेर मुख्तारला त्याच्याच वादग्रस्त अँब्युलन्ससह घेऊन उत्तर प्रदेश पोलीस पंजाबच्या रूपनगर जेलमधून बाहेर पडले आहेत. मुख्तार अन्सारीला बांदा जेलमध्ये आणण्यात येईल, असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.मुख्तार आजारी असल्याने त्याला प्रवास झेपणार नाही. तो व्हिलचेअरवर असतो वगैरे सगळे युक्तिवाद न्यायालयात करून झाले. पण सुप्रिम कोर्टाने ते सगळे फेटाळून मुख्तारचा ताबा उत्तर प्रदेश पोलीसांकडे द्यावा, असे आदेश दिले. आधीही असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले होते. पण त्याची अंमलबजावणी पंजाब सरकारने केली नव्हती. त्यासाठी वेगवेगळे बहाणे शोधण्यात आले होते.

यावेळी मात्र पंजाब सरकारचे आणि मुख्तार अन्सारीचे कोणतेही बहाणे उपयोगी ठरले नाहीत. अखेर त्याचा ताबा उत्तर प्रदेश पोलीसांच्या टीमकडे द्यावा लागला. मुख्तारच्या वादग्रस्त अँब्युलन्ससह की जी अँब्युलन्स सरकारी आहे. आणि तो २०१३ पासून तो वापरतो आहे. तिच्यात सॅटेलाइट फोन आहे आणि कथित स्वरूपात बुलेटप्रूफ आहे, मुख्तारला उत्तर प्रदेशात नेण्यात येत आहे.

-मुख्तारला एन्काउंटरची भीती

मुख्तारवर पंजाबमध्ये फक्त खंडणीची केस होती. उत्तर प्रदेशात हत्येसह १५ गंभीर केसेस आहेत. तरीही मुख्तार साधारण दोन वर्षांपासून पंजाबच्या जेलमध्ये होता. त्याला उत्तर प्रदेशात आपल्या एन्काउंटरची भीती वाटते आहे. त्याच्या पत्नीने त्याचा एन्काउंटर होणार नसल्याची गॅरेंटी मागितली आहे. तिने राष्ट्रपतींपर्यंत आपला अर्ज नेला आहे.

आता मुख्तारला बांदा जेलमध्ये ठेवण्यात येईल. त्याच्यावर एकापाठोपाठ एक केसेस कोर्टात चालविण्यात येतील.

Punjab: A team of UP Police leaves from Rupnagar jail with gangster-turned-politician Mukhtar Ansari, for Banda.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*