चार मराठी तरुणांची एनडीएच्या १४६व्या तुकडीत धडक


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४६व्या तुकडीसाठी झालेल्या परीक्षेत जोरदार कामगिरी करून चार मराठी तरुणांनी एनडीएत प्रवेश मिळवला आहे. या चौघांमध्ये दोन तरुण पुण्यातले आहेत.proverb has been erased by the zealous Marathi youth. Consistently, Marathi youth are enrolling in the National Defense Academy.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) जाहीर केलेल्या निकालात शार्दूल कांबळे (पुणे), मयूर ढाकणे (पुणे), संकल्प चौधरी (भुसावळ) आणि अभिषेक गाडे (रिसोड-वाशीम) या चार मराठी तरुणांनी एनडीएत धडक मारली. या चौघांनी संपूर्ण भारतात अनुक्रमे १९०, १९९, ३४४ आणि ३४७ वा क्रमांक मिळवला आहे.



एनडीए ही भारतीय सैन्यदळ आणि वायुदळासाठी उच्चाधिकारी निर्माण करणारी संस्था म्हणून जगात नावाजली जाते. हे सर्व तरुण सप्टेंबरमध्ये एनडीएमध्ये दाखल होतील. शार्दूल कांबळे आणि मयूर ढाकणे यांची निवड हवाईदलासाठी झाली आहे. तर संकल्प चौधरी व अभिषेक गाडे यांनी निवड सेनादलासाठी झाली आहे.

पुण्यात धनकवडी येथे राहणाऱ्या शार्दूल कांबळे याने दहावी सीबीएसई परीक्षेत ८५.६ टक्के (२०१९) गुण मिळवले आहेत. बारावीत त्याने ८२.५ टक्के (२०२१) गुण मिळवले. शार्दूलने अँपेक्स करिअर्स अकादमीमध्ये एनडीएची तयारी केली. तो म्हणाला की, अकादमीत दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतल्याने त्याचा खूप फायदा झाला. एसएसबी मुलाखतीसाठी लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त), हृषिकेश आपटे यांच्या मार्गदर्शनाला फायदा झाला.

पुण्यात सांगवी येथे राहणाऱ्या मयूर ढाकणे याने सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत ९३.२ टक्के (२०१८) गुण मिळवले. बारावीत त्याने ७९.२ टक्के गुण मिळवले. मयूरने सांगितले की, मी चार महिन्यांचा लेखी परीक्षेच्या कोचिंगचा क्लास लावला होता. त्याचा चांगला फायदा झाला.

संकल्प चौधरी याने भुसावळमध्ये शिक्षण घेतले. दहावीत सीबीएसईच्या परीक्षेत त्याने ८२.२ टक्के (२०१८) गुण मिळवले. बारावीत त्याने ७९.२३ टक्के (२०२०) गुण मिळवले. वाशीम येथे राहणाऱ्या अभिषेक गाडे याने दहावीत ९७ टक्के (२०१८) गुण मिळवले. बारावीत त्याने ८१.०८ टक्के (२०२०) गुण मिळवले.

लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) म्हणाले की, राज्यातून अधिकाधिक तरुणांची एनडीएमध्ये निवड होऊ लागली आहे याचा आनंद आहे. येत्या काळात राज्याचा एनडीएमधील मराठी टक्का आणखी वाढेल अशा विश्वास वाटतो.

 proverb has been erased by the zealous Marathi youth. Consistently, Marathi youth are enrolling in the National Defense Academy.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात