
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदी आणून आज पाच वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी नोटबंदीची विविध कारणे सांगितलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रियांका गांधी यांनी एक ट्विट करून सवाल विचारले आहेत. Priyanka’s question on Modi government on the day of ban on banknotes !!
नोटबंदी यशस्वी झाली आहे, तर काळा पैसा परत आला का??, भ्रष्टाचार संपला का??, दहशतवादावर प्रहार झाला का??, गरिबी हटली का?? आणि महागाई कमी झाली का?!, असे एका पाठोपाठ एक सवालांचे बाण प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर सोडले आहेत.
नोटबंदी करताना पंतप्रधान मोदी यांनी त्याचे समर्थन केले होते. दहशतवाद्यांचे फंडिंग बंद होईल. दहशतवाद्यांनी बाजारात आणलेल्या सगळ्या नोटा रद्द होऊन अर्थव्यवस्था शुद्ध होईल. डिजिटल अर्थव्यवस्थेद्वारे भ्रष्टाचार कमी होईल. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना अधिक सक्षमपणे पोहोचतील. या योजनांसाठी अधिक पैसा उपलब्ध होईल, असे अनेक फायदे पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी समर्थनासाठी मोजले होते.
अगर नोटबंदी सफल थी तो
भ्रष्टाचार खत्म क्यों नहीं हुआ?
कालाधन वापस क्यों नहीं आया?
अर्थव्यवस्था कैशलेस क्यों नहीं हुई?
आतंकवाद पर चोट क्यों नहीं हुई?
महंगाई पर अंकुश क्यों नहीं लगा?#DemonetisationDisaster— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 8, 2021
त्यांचे प्रत्यक्षात काय झाले याचे विवरण सरकारतर्फे अनेकदा करण्यात आले आहे. डिजिटल पेमेंट मध्ये झालेली वाढ अनेकदा दाखवून देण्यात आली आहे. त्याचे अनुषंगिक फायदेही समाजाला दिसले आहेत. परंतु प्रियांका गांधी यांनी मात्र पंतप्रधान मोदी यांनी त्या वेळी सांगितलेल्या मुद्द्यांवर आधारित एकापाठोपाठ एक सवाल करत मोदी सरकारला नोटबंदीच्या वाढदिवशी घेरले आहे.
Priyanka’s question on Modi government on the day of ban on banknotes !!
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल