CBSE वर प्रियांका गांधींचा संताप, म्हणाल्या – कोरोना काळात मुलांना परीक्षेच्या सक्तीसाठी हे बोर्ड जबाबदार!

Priyanka Gandhi Lashes Out CBSE, said - exams Should Be Cancelled in Corona period

Priyanka Gandhi : देशात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसारखे बोर्ड मुलांना परीक्षेला भाग पाडण्यास जबाबदार आहेत, असा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी केला. परीक्षा रद्द करावी किंवा गर्दीच्या परीक्षा केंद्रांवर मुलांनी जाऊ नये, अशी व्यवस्था केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. Priyanka Gandhi Lashes Out CBSE, said – exams Should Be Cancelled in Corona period


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसारखे बोर्ड मुलांना परीक्षेला भाग पाडण्यास जबाबदार आहेत, असा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी शुक्रवारी केला. परीक्षा रद्द करावी किंवा गर्दीच्या परीक्षा केंद्रांवर मुलांनी जाऊ नये, अशी व्यवस्था केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की, “कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुन्हा एकदा आपल्या देशाला घेरले आहे. अशा परिस्थितीत परीक्षेसाठी दबाव आणल्यास मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल. आमच्या शिक्षण व्यवस्थेने आपल्या भूमिकेत मोठा बदल घडवून आणणे गरजेचे आहे. मुलांच्या संदर्भात फक्त संमेलने व चर्चासत्रांमध्ये चर्चा न करता संवेदनशीलता व अनुकंपा दाखवणे आवश्यक आहे. प्रियांकांनी आरोप केला की, “सध्याच्या परिस्थितीत मुलांना परीक्षेला बसण्यासाठी मजबूर करण्यास सीबीएसईसारखे बोर्ड पूर्णपणे जबाबदार आहेत.”

त्यांनी सरकारला आग्रह केला की, “बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा त्यांचे वेळापत्रक बदलावे किंवा मुलांना कोणत्याही गर्दीच्या परीक्षा केंद्रावर जावे लागू नये, अशा पद्धतीने परीक्षा घ्यावी.”

दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बोर्ड परीक्षांशी संबंधित सुधारित तारखेनुसार, दहावीच्या परीक्षा 4 मे ते 7 जूनदरम्यान घेण्यात येणार आहेत, तर 12वीच्या परीक्षा 4 मे ते 15 जूनदरम्यान घेण्यात येतील.

Priyanka Gandhi Lashes Out CBSE, said – exams Should Be Cancelled in Corona period

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात