आनंदाची बातमी : हरियाणाच्या दोन पहिलवान मुलींना मिळाले टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट, साक्षी मलिकची निराशा

wrestlers anshu malik and sonam From haryana qualified for tokyo olympic

Tokyo Olympic : क्रीडाविश्वासाठी आनंदाची बातमी आली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी हरियाणातील दोन महिला कुस्तीपटूंना तिकिटे मिळाली आहेत. अंशु मलिक आणि सोनम मलिक यांनी कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही कुस्तीपटू 62 किलो गटांत खेळतात. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही पहिलवानांचे अभिनंदन केले आहे. wrestlers anshu malik and sonam From haryana qualified for tokyo olympic


विशेष प्रतिनिधी

सोनिपत : क्रीडाविश्वासाठी आनंदाची बातमी आली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी हरियाणातील दोन महिला कुस्तीपटूंना तिकिटे मिळाली आहेत. अंशु मलिक आणि सोनम मलिक यांनी कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंशु मलिक 57 किलो व सोनम मलिक 62 किलो गटात खेळत आहेत. सोनम ही सोनिपतची, तर अंशु मलिक जिंदची रहिवासी आहे. त्याचवेळी कुस्तीपटू साक्षी मलिकला मात्र पात्रत फेरित चमक न दाखवता आल्याने धक्का बसला आहे. दोन्ही कुस्तीपटू 62 किलो गटांत खेळतात. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही पहिलवानांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर कुस्तीपटू विनेश फोगाटनेही या दोघींची अभिनंदन केले आहे.

निदानी गावची 19 वर्षीय महिला कुस्तीपटू अंशु मलिक हिने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तीन कुस्तीपटूंचा पराभव केला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेलग्रेड येथे झालेल्या कुस्ती विश्वचषक स्पर्धेत अंशुने देशासाठी रौप्यपदक जिंकले होते. विश्‍व चषक स्पर्धेत चांगली तयारी केल्यानंतर व आताच्या पात्रता फेरीत प्रवेशानंतर अंशु मलिक आनंदात आहे.

दरम्यान, यावर्षी जानेवारीमध्ये आग्राच्या लडामदा गावात झालेल्या महादंगलमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या कुस्तीपटू साक्षी मलिकचा अंतिम फेरीत कुस्तीपटू सोनमने पराभव केला. पराभूत झाल्यावर साक्षीच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकचा पराभव केल्यानंतर विजयी कुस्तीपटू सोनम म्हणाली की, हा क्षण तिच्यासाठी खूप आनंदाचा आहेत. सोनमने सांगितले की, तिने साक्षी मलिकला ट्रायलमध्येही पराभूत केले आहे. तिने आपल्या विजयाचे श्रेय आईवडील व प्रशिक्षकांना दिले.

wrestlers anshu malik and sonam From haryana qualified for tokyo olympic

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात