वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल विचारणा झाली. त्यावेळी प्रियंका गांधी पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारला. त्या म्हणाल्या की, तुम्हाला दुसरा कोणता चेहरा दिसतो का? Priyanka Gandhi is the Chief Ministerial candidate of Uttar Pradesh Indirect declaration of one’s own name
महिलांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना प्रियंका गांधी यांनी त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी सांगितले. प्रियंका म्हणाल्या की जाहीरनाम्यात 20 लाख सरकारी भरतीचे आश्वासन दिले आहे. यापैकी 8 लाख सरकारी पदे महिलांसाठी असतील. नोकऱ्यांची आश्वासने कशी पूर्ण होतील या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की 20 लाख नोकऱ्यांपैकी 12 लाख नोकऱ्या अशा आहेत ज्यांची सरकारी पदे रिक्त आहेत. त्याचे बजेटही सरकारकडे आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून 8 लाख इतर रोजगार निर्माण होतील.
निवडणुकीनंतर त्या अन्य पक्षाला पाठिंबा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना प्रियंका म्हणाल्या की, जर अशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही ज्या आघाडीमध्ये सहभागी होऊ, त्यांनी महिला आणि तरुणांसाठी दिलेली आश्वासने सरकारच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट केली पाहिजेत.
14 कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या : राहुल गांधी
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, लहान आणि मध्यम व्यवसायातून नोकऱ्या येतात. मोठ्या उद्योगांमधून रोजगार कमी येतो. छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्याचे भाजपचे धोरण आहे. नोटाबंदी, चुकीचा जीएसटी आणि कोरोनाच्या वेळी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे 14 कोटी तरुणांनी रोजगार गमावला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App