विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज जग भारताकडे एका आशेने, विश्वासाने पाहते आहे. कारण भारतातील लोकही तरुण आहेत आणि भारताचे मनही तरुण आहे. भारत त्याच्या क्षमतेपेक्षा तरुण आहे, भारत त्याच्या स्वप्नांपेक्षा तरुण आहे. भारत त्याच्या विचारांपेक्षा तरुण आहे, भारत त्याच्या चेतनेपेक्षा तरुण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.Prime Minister Narendra Modi said, the people of India and the minds are young
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन केले. याची स्थापना पुद्दुचेरीमध्ये सुमारे 122 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने करण्यात आली आहे. यावेळी ते म्हणाले की, भारतमातेचे महान पुत्र स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी नमन करतो.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात त्यांची जयंती अधिक प्रेरणादायी ठरली आहे. भारतातील तरुणांमध्ये टेक्नॉलॉजीचे चार्म आहे, तर लोकशाहीची चेतना देखील आहे. आज भारतातील तरुणांमध्ये श्रम करण्याची क्षमता असेल तर भविष्याचीही स्पष्टता आहे. त्यामुळेच भारत आज जे बोलतो, त्याला जग उद्याचा आवाज मानते.
मुलगा आणि मुलगी समान आहेत. हाच विचार करून सरकारने मुलींच्या भल्यासाठी लग्नाचे वय 21 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीही त्यांचे करिअर घडवू शकतील, त्यांना अधिक वेळ मिळेल या दिशेने टाकलेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे,
असे सांगून पंतप्रधान म्हणाले, तरुणांमध्ये ती क्षमता आहे, ती शक्ती आहे की तो जुन्या रुढींचे ओझे उचलत नाही, त्यांना कसे झटकून टाकायचे हे त्यांना माहीत आहे. हा तरुण स्वत:ला, समाजाला, नवीन आव्हानांना, नवीन मागण्यांनुसार विकसित करु शकतो. नवीन सृजन करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App