ॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला!!


वृत्तसंस्था

गांधीनगर : एरवी कोणत्याही शहरांमध्ये व्हीव्हीआयपी मुव्हमेंट असेल तर सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक कोंडीत अथवा अन्यत्र कशी गैरसोय होते याच्या बातम्या आणि फोटो नेहमीच प्रसिद्धी माध्यमांमध्ये येत असतात. पण व्हीव्हीआयपी मुव्हमेंटची वेगळी बातमी आज झाली आहे आणि ती दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीव्हीआयपी मुव्हमेंटची आली आहे. Prime Minister Modi stopped his convoy to give way to an ambulance

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. त्यांनी काल नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये नॅशनल गेम्सचे उद्घाटन केले. आज वंदे मातरम ट्रेनचे उद्घाटन केले. त्याचबरोबर साबरकांठा मध्ये रोड शो केला.

पण तत्पूर्वी आमदाबाद वरून गांधीनगरला जाताना मोदींनी आपल्या व्हीव्हीआयपी मुव्हमेंट मधून एक अडचण हेरली आणि तात्काळ आदेश देत आपला गाड्यांचा ताफा थांबविला. कारण त्याचवेळी या गाड्यांच्या ताफ्यामुळे एका ॲम्बुलन्सला अडथळा होत होता. पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबवून हा अडथळा दूर केला आणि ॲम्बुलन्सला जायला वाट मोकळी करून दिली. ऍम्ब्युलन्स पुढे निघून गेल्यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा आपल्या नियोजित स्थळाकडे रवाना झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याचबरोबर याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

Prime Minister Modi stopped his convoy to give way to an ambulance

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण