पाकिस्तान कंगाल, देश चालविण्यासाठीही पैसे नसल्याची पंतप्रधान इम्रान खान यांची कबुली


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानला परदेशी कर्जांतून मुक्त करून ‘रियासत ए मदीना’ बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. आता मात्र देश कंगाल झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. देश चालवण्यासाठी पुरेसे पैसे नसणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे. परदेशांकडून उधार घेणं भाग पडतं असल्यानं पाकिस्तानवर कजार्चं ओझं वाढत चाललेय, असे त्यांनी म्हटले आहे.Prime Minister Imran Khan admits that Pakistan is poor and has no money to run the country

कर वसुलीत कमी आणि वाढत्या परदेशी कजार्मुळे पाकिस्तानवर ही परिस्थिती ओढावल्याचे सांगून इम्रान खान म्हणाले, हा प्रश्न देशाच्या आर्थिक प्रश्नासोबतच सुरक्षेच्या प्रश्नाशी निगडीत आहे. ‘पाकिस्तान फेडरल बोर्ड ऑफ रिव्हेन्यू’च्या पहिल्या ‘ट्रॅक अँड ट्रेस सिस्टम’च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले, ट्रॅक अँड ट्रेस सिस्टम’द्वारे करचुकवेगिरी करणाºयांना शोधून काढून त्यांच्याकडून करवसुली केली जाणार आहे.पाकिस्तान सरकारनं आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाकडून ) घेतलेल्या ६ अरब डॉलर बेलआऊट पॅकेजचा पुनरुद्धार सुनिश्चित करण्यासाठी खर्चात कपात आणि अधिक कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पाकिस्तानची तिजोरी रिकामी आहे, उत्पन्न कमी आहे आणि खर्च अधिक आहे. पाकिस्तानमध्ये करप्रणाली सुरळीत लागू होऊ शकली नाही.

लोकांनी करचुकवेगिरी केली. ही चांगली गोष्ट नाही, परंतु लोकांना ही गोष्ट अद्याप लक्षात आलेली नाही. कर वसुली नागरिकांच्या हितासाठीच केली जाते, असं म्हणत इम्रान खान यांनी नागरिकांना करप्रणालीचं महत्त्व पटवून देत पाकिस्तानवर १० वर्षांपूर्वी असलेलं ६ ट्रिलियनचं कर्ज आज ३० ट्रिलियनवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

Prime Minister Imran Khan admits that Pakistan is poor and has no money to run the country

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण