विशेष प्रतिनिधी
रायगड: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवार (6 डिसेंबर) किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. यावेळी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांना दांडपट्टा, भवानी तलवार, अज्ञापत्राची प्रत आणि शिवकालीन होन याची प्रतीकृती राष्ट्रपतींना भेटही दिली.
यावेळी भाषण करताना राष्ट्रपती म्हणाले आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चाललो तर आपण एकविसाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रती कल्पना साकार करू.
1980 साली इंदिरा गांधी यांनीदेखील रायगडाला भेट दिली होती. त्यानंतर 1985 साली तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आले होते. आता तब्बल 35 वर्षांनंतर भारताचे राष्ट्रपती रायगड दौऱ्यावर आले आहेत.
७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार ; छत्रपती संभाजीराजेंनी ट्विटद्वारे दिली माहिती
या दौर्यादरम्यान राष्ट्रपतींनी प्रथम होळीच्या माळावरील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर दौऱ्याच्या शेवटी शिव समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान, राजसदर येथे छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रपती महोदयांचा आदर सत्कारही करण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींनी शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाच्या कार्य पद्धतीबद्दल आणि देशातील पहिल्या नौदलाच्या स्थापनेबद्दल कौतुकोद्गार काढले.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चाललो तर आपण एकविसाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रती कल्पना साकार करू.’ असा विश्वासही राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती कोविंद हे साधारण 12 वाजेच्या सुमारास रायगड किल्ल्यावर सपत्नीक पोहचले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केलं.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रपतींचा दौरा असल्याने या संपूर्ण भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रायगडकडे जाणाऱ्या महाड व माणगाव तालुक्याच्या प्रवेश रस्त्यांपासून पाचड परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.
सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग मिळून 1000 पेक्षा जास्त पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. तसेच दगंल नियत्रंण पथक, स्पेशल कमांडो, राष्ट्रपती सुरक्षा कमांडो, CBI व RAW चे अधिकारी वर्गही रायगडात दाखल झाले होते.
सुरक्षेचा चोख बंदोबस्त
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यामुळे रायगडावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. रायगड पर्यटक आणि इतरांसाठी 3 ते 7 डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आलाय. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरातही पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App