वृत्तसंस्था
नवी दिल्ली – ज्येष्ठ पत्रकार आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते स्वपन दासगुप्ता यांची आज राष्ट्रपतींनी राज्यसभेवर पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे. दासगुप्ता यांची ही दुसऱ्यांदा नियुक्ती आहे. President Ram Nath Kovind has re-nominated BJP leader Swapan Dasgupta, to Rajya Sabha
दासगुप्ता यांनी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवताना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. कारण त्यांची आधीचीही नियुक्ती राष्ट्रपतींनीच केली होती.
मात्र, दासगुप्ता हे बंगाल विधानसभेच्या निवडणूकीत पराभूत झाले. त्यामुळे ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य उरले नाहीत. त्यांची आज राष्ट्रपतींनी राज्यसभेवर फेरनियुक्ती केली आहे. तशा आशयाचे पत्रक राष्ट्रपतींचे संयुक्त सचिव श्री. प्रकाश यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
President Ram Nath Kovind has re-nominated BJP leader Swapan Dasgupta, to Rajya Sabha Dasgupta had resigned to contest in West Bengal Assembly polls in March pic.twitter.com/vjoBIV6Kjr — ANI (@ANI) June 1, 2021
President Ram Nath Kovind has re-nominated BJP leader Swapan Dasgupta, to Rajya Sabha
Dasgupta had resigned to contest in West Bengal Assembly polls in March pic.twitter.com/vjoBIV6Kjr
— ANI (@ANI) June 1, 2021
दासगुप्ता यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्याच जागेवर त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यामुळे त्यांची राज्यसभेची मुदत नव्याने सुरू न होता आधीच्या मुदतीसह ते ६ वर्षे पूर्ण झाल्यावर राज्यसभेतून रिटायर होतील, असा त्याचा अर्थ आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App