BJP’s rath for the Babasaheb Bhimrao Ambedkar Samman Yatra, parked in Purulia, vandalised

तृणमूलची गुंडगिरी, जेपी नड्डा प्रचार करणार असलेल्या भाजपच्या रथाची पुन्हा तोडफोड, तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जींच्या सभेनंतर घडला प्रकार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारादरम्यान पुन्हा एकदा भाजपच्या रथांची तोडफोड करण्यात आली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रे’च्या रथाची तोडफोड करून चालकावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पुरुलिया येथील सभेनंतर रथाची तोडफोड करण्यात आली. BJP rath for the Babasaheb Bhimrao Ambedkar Samman Yatra, parked in Purulia, vandalised


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारादरम्यान पुन्हा एकदा भाजपच्या रथांची तोडफोड करण्यात आली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रे’च्या रथाची तोडफोड करून चालकावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पुरुलिया येथील सभेनंतर रथाची तोडफोड करण्यात आली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा कोतुलपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत आणि ते येथूनच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रे’ला सुरुवात करणार आहेत.अमित मालवीय यांनी ट्विट करून केला निषेध

भाजपचे केंद्रीय प्रभारी अमित मालवीय यांनी ट्वीट केले की, “पुरुलिया येथे पार्क केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रे’च्या भाजपच्या रथांची तोडफोड करण्यात आली. चालक जखमी झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा कोतुलपूर येथून यात्रा काढणार आहेत. ती रोखण्यासाठी तृणमूल यापेक्षा जास्त काही करू शकत नाही! पिशीला एवढी भीती कशाची आहे?”

नड्डांचा ममतांवर हल्लाबोल

दरम्यान, जेपी नड्डा यांनी बिष्णुपुरात रोड शो केला आणि म्हटले की, ममताजींचा बंगालमधील खेळ संपला आहे. भाजप बंगालमध्ये येत आहे. नड्डांच्या या यात्रेत ठाकूर पंचानन बरम आणि हरीचंद ठाकूर यांच्यासारख्या अनुसूचित जाती (एससी) नेत्यांचा गौरव केला जाईल. उल्लेखनीय आहे की, बाबासाहेब आंबेडकर यांना मान न दिल्याबद्दल जेपी नड्डांना अनेकदा विरोधकांनी लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, बाबासाहेबांना जिवंतपणी मिळायला हवा होता तो सन्मान मिळाला नाही. परंतु त्यांचे संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

BJP rath for the Babasaheb Bhimrao Ambedkar Samman Yatra, parked in Purulia, vandalised

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*