नाशिक : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व संमतीचा उमेदवार असावा यासाठी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे अधिकार आणि जबाबदारी सोपवली आहे. हे दोन्ही नेते आपल्या शांतपणे चाली रचताना दिसत आहेत. भाजप आघाडीतून राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावाचा सुगावाही लागत नाही. पण विरोधी आघाडीवर मात्र मल्लिकार्जुन खर्गेंपासून शरद पवारांपर्यंत अनेक नावांची गडबडीने चर्चा सुरू झाली आहे. President Elections : BJP is cool but opposition despite inevitable defeat holding meetings
स्वतः शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारल्यानंतर देखील त्यांना त्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, डाव्या पक्षांचे नेते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह आदी नेते गळ घालताना दिसत आहेत.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जिंकणार हे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट आहे. तरी देखील सत्ताधारी आघाडी पूर्ण शांतता आहे. उमेदवारीबाबत प्रसार माध्यमांनी जोरदार पतंग मात्र उडवले आहेत. परंतु, ज्यांच्या विजयाची शक्यता सुतराम नाही आणि पराभवाची शक्यता दाट आहे, अशा सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीवर मात्र उमेदवारांची गडबडीने चर्चा आहे!! उद्या दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला काँग्रेसचे मल्लिकार्जून खर्गे, जयराम रमेश, डाव्या पक्षांचे नेते डी. राजा, शरद पवार डॉ. फारुख अब्दुल्ला आदी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परंतु, ममता बॅनर्जी यांनी निमंत्रित केलेले नेमके कोणते मुख्यमंत्री उपस्थित राहतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आकडेवारीनुसार सर्व विरोधकांनी सर्वसंमतीने शरद पवार यांच्या सरखा तगडा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला तरी आकडेमोडीच्या खेळात ते मागेच पडणार आहेत. कारण भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे संपूर्ण बहुमत आहे. 14 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विरोधकांच्या सर्वसंमतीचा एकच उमेदवार देखील जिंकण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत शरद पवारांना सर्व विरोधी पक्ष मिळून गळ घालताना दिसत आहेत. मात्र खुद्द पवार आपल्या उमेदवारीची शक्यता नाकारली आहे.
असे असताना देखील सर्व विरोधी पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी त्यांना शरद पवार यांच्यासारख्या तगडा उमेदवार राष्ट्रपती निवडणुकीसाठी हवा आहे. प्रश्न खरा हा आहे की हरणाऱ्या निवडणुकीत स्वतः पवार उतरतील?? एवढी राजकीय त्यागबुद्धी दाखवतील??, हे राष्ट्रपतीपदाच्या दृष्टीने नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App